नदीतील खडक अन् लाकडांपासून उभारलं कंगनाचं नवं घरं; पाहा 'क्वीन'च्या मनालीतील घराचे Inside फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 07:00 IST2022-06-10T07:00:00+5:302022-06-10T07:00:02+5:30
Kangana ranaut:कंगनाच्या घराच्या भिंती नदीतील खडकांपासून तयार करण्यात आल्या आहेत. तर, सोबतच भरीव लाकडी कामही त्यावर करण्यात आलं आहे.

निर्भीडपणे आणि बेधडकपणे समाजातील प्रत्येक घटनेवर व्यक्त होणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत.

उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणारी कंगना अनेकदा तिच्या प्रोफेशनल लाइफमुळेही चर्चेत येत असते.

सध्या कंगना तिच्या नव्या घरामुळे चर्चेत येत आहे. बॉलिवूड क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंगनाने तिच्या गावी म्हणजेच मनालीमध्ये एक छानसं घर बांधलं आहे.

कंगनाने अत्यंत विचारपूर्वक या घराची रचना केली आहे. तसंच घरातील प्रत्येक कोपरा न् कोपरा विचार करुन डिझाइन केला आहे.

कंगनाचं घर प्रचंड मोठं आणि आलिशान असून हे घर डिझाइन करताना तिने लहान लहान गोष्टींचाही नेटाने विचार केला आहे.

कंगनाच्या घरात अनेक बेडरुम्स आहेत. हे पाहून तिने घरातील प्रत्येक सदस्याचा विचार करुन हे घर तयार केल्याचं म्हटलं जातं.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या कंगनाने या आलिशान घराचे काही फोटो शेअर केले आहेत. सोबतच एक पोस्टही लिहिली आहे.

कंगनाच्या घरात अनेक पेटिंग्स, फोटो फ्रेम लावण्यात आल्या आहेत.

या घरात लाकडाचं मजबूत भक्कम काम केलेलं आहे.

कंगनाच्या घरात जुन्या प्राचीन गोष्टींचा भरणा असल्याचं पाहायला मिळतं.

कंगनाने डिझाइन केलेलं मास्टर बेडरुम

घरात पारंपरिक वस्तूंसोबतच काही आधुनिक गोष्टींचाही समावेश तिने केला आहे.

कंगनाच्या घराच्या भिंती नदीतील खडकांपासून तयार करण्यात आल्या आहेत. तर, सोबतच भरीव लाकडी कामही त्यावर करण्यात आलं आहे.
















