शाहरुखसोबत झळकली, रातोरात झाली स्टार! लग्नानंतर बॉलिवूडला ठोकला रामराम; आता काय करते माहितीये?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 18:46 IST2025-12-08T18:39:37+5:302025-12-08T18:46:48+5:30
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने तिच्या संपूर्ण कारकिर्दीत फक्त एकाच चित्रपटात काम केलं. मात्र, या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडण्यात यशस्वी झाली. या अभिनेत्रीला आजही लोक तिला विसरलेले नाहीत.

बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेला अभिनेता शाहरुख खानचा 'स्वदेस' चित्रपट आजही प्रेक्षकांमध्ये क्रेझ आहे.

याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री गायत्री जोशी. स्वदेस मधून हे मराठमोळं नाव चांगलंच प्रसिद्धीझोतात आलं.

गायत्री जोशीने २००० मध्ये फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनलचा खिताब जिंकला आणि त्यानंतर मिस इंटरनॅशनल २००० या सौंदर्य स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.

गायत्री जोशी २००४ साली प्रदर्शित झालेल्या स्वदेश चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित चित्रपटात तिने गीता नावाचं पात्र साकारलं होतं.

या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान प्रमुख भूमिकेत होता. हा चित्रपट खूप गाजला. मात्र, या चित्रपटानंतर अभिनेत्री इंडस्ट्रीत कुठेही दिसली नाही.

गायत्रीने २००५ साली उद्योगपती विवेक ओबेरॉय यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. विवेक यांची मुंबईत रिअर इस्टेट फर्म आहे.

स्वदेसच्या रिलीजनंतर एका वर्षातच संसार थाटला आणि चित्रपटसृष्टीला रामराम केला.गायत्री सुद्धा या बिझनेसमध्ये हातभार लावते. मिडिया रिपोर्टनुसार, गायत्री जोशी आणि विकास ओबेरॉय यांची एकूण संपत्ती ४५,००० कोटी रुपये आहे.
















