आरस्पानी सौंदर्य! अभिनेत्री ईशा गुप्ताचा मनमोहक अंदाज; फोटो पाहतच राहाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 16:35 IST2024-09-16T16:27:02+5:302024-09-16T16:35:22+5:30

ईशा गुप्ताच्या साडीतील फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या फोटोशूटमुळे कायमच चर्चेत येत असते. ईशा गुप्ताला बॉलिवूडची ‘अँजेलिना जॉली’ असं म्हटलं जातं.

इमरान हाश्मीसोबत ईशा गुप्ताने 'जन्नत २' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने इमरान हाश्मीसोबत स्क्रीन शेअर केली होती.

ईशा सोशल मीडियावर कायमच अ‍ॅक्टिव्ह असते. नेहमी सोशल मीडियावर ड्रेसिंग सेन्स व हॉट फोटोंमुळे तिची चर्चा होते.

नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे काही निवडक फोटो शेअर केले आहेत.

ज्यामध्ये अभिनेत्रीचा पारंपरिक अंदाज नेटकऱ्यांना पाहायला मिळतो आहे.

फोटोंमध्ये फिकट गुलाबी रंगाच्या साडीत ईशाचं सौंदर्य खुललं आहे.

'राज ३', 'जन्नत २', 'रुस्तम', 'बादशाहो', 'टोटल धमाल' अशा सुपरहिट सिनेमांच्या माध्यमातून तिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.