तब्बल 35 चित्रपटात केलं काम, दोनच झाले हिट तर बाकी सुपरफ्लॉप; अभिनेत्रीचा संघर्ष संपता संपेना!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 04:05 PM2024-01-16T16:05:24+5:302024-01-16T16:31:08+5:30

लहानपणीच लग्न, घटस्फोट झाला, गेल्या वर्षीच अडकली दुसऱ्यांदा लग्नबंधनात

फिल्म इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत जे रातोरात स्टार झाले आहेत. एका सिनेमातून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळालेली असते. मात्र नंतर त्यांचे चित्रपट चालत नाहीत. त्यामुळे ज्या वेगाने त्यांना यश मिळतं तितक्याच झटकन ते खालीही येतात.

बॉलिवूडमध्ये अशी एक अभिनेत्री आहे जिला मोठ्या संघर्षानंतर आणि आव्हानांनंतर यश मिळालं. लहान वयातच तिने लग्न केलं पण ते फार काळ टिकलं नाही. यानंतर तिने सिनेमांमध्ये साईड भूमिका केल्या. अभिनेत्रीचा केवळ सलमान खानसोबत एक सिनेमा सुपरहिट झाला बाकी सगळे फ्लॉप झाले.

ही गोष्ट आहे अभिनेत्री माही गिलची (Mahie Gill). तिचं खरं नाव रिम्पी कौर आहे. हिंदी आणि पंजाबी सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. 1975 साली चंदीगढ येथे तिचा जन्म झाला. ९० च्या दशकातच तिचं विक्रमजीत सिंहसोबत लग्न झालं.

जेव्हा तिचं लग्न झालं तेव्हा ती अल्पवयीन होती. तिचं वय 17 वर्षे होतं. अनेक वर्षांनंतर तिचा घटस्फोट झाला. खूप कमी वयात लग्न झालं होतं आणि मॅच्योर नसल्याने घटस्फोट झाल्याचं ती म्हणाली होती.

माहीला 2003 साली आलेल्या 'हवाएं' सिनेमात पहिला ब्रेक मिळाला. तिच्या करिअरचे सुरुवातीचे काही दिवस संघर्षाचे होते. तिने अनेक साईड कॅरेक्टर्स केले. 2009 साली आलेल्या 'DEV D' सिनेमाने तिला प्रसिद्धी मिळाली. मात्र आजच्या काळात ज्याप्रकारे एखादी न्यूकमर फेमस होते तितकी लोकप्रियता तिला मिळू शकली नाही.

यानंतर माहीने अनुराग कश्यपच्या 'देवदास' मध्ये पारोच्या भूमिकेत दिसली. मात्र यामुळे तिच्यावर बोल्ड अभिनेत्रीचा टॅग लागला. 2010 मध्ये तिला सलमान खानच्या 'दबंग' सिनेमात भूमिका मिळाली. यामध्ये तिने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली.

दबंग हिट झाल्यानंतर तिने इरफान खानसोबत 'पान सिंह तोमर'मध्ये स्क्रीन शेअर केली. तसंच 'साहिब बीवी और गँगस्टर' मध्येही काम केले. पण हे फारसे चालले नाहीत.

माहीने रवी केसरसोबत गोवामध्ये गुपचूप लग्न केले. गेल्यावर्षीच तिने लग्नाची बातमी जाहीर केली. तिने पहिल्यांदाच रवीला सर्वांसमोर आणले. ती वैयक्तिक आयुष्याविषयी फारसं कधी बोलत नाही.

इतक्या वर्षात माहीने एकूण 35 सिनेमांमध्ये काम केले आहे. मात्र त्यातील फक्त २ चित्रपट हिट झाले. बाकी सगळे सिनेमे फ्लॉप झाले आहेत. अजूनही माही गिल इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख बनवण्याचा प्रयत्न करत आहे.