"कितना हसीन चेहरा..." अभिनेत्री अदिती राव हैदरीचा सोज्वळ लूक; फोटो चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 15:57 IST2024-11-26T15:51:57+5:302024-11-26T15:57:01+5:30
अदिती राव हैदरी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

अदितीने फक्त हिंदीच नाही तर तमिळ, तेलुगू व मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
अलिकडेच अभिनेत्री अदिती राव हैदरी सध्या तिच्या ‘हीरामंडी : द डायमंड बाजार’ या सीरिजमुळे प्रचंड चर्चेत होती.
या सीरिजमध्ये ‘बिब्बोजान’ हे तिने साकारलेलं पात्र चांगलंच लोकप्रिय झालं आहे.
सध्या अभिनेत्री तिच्या वैवाहिक जीवनात व्यस्त आहे.
अदिती सोशल मीडियावर कायमच सक्रिय असलेली पाहायला मिळते.
त्याद्वारे आपले फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत ती शेअर करत असते.
नुकतंच तिने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान करून फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमध्ये आदितीचा सोज्वळ लूक पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.