बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला डेब्यू, आता 'OTT' चा घेतला आधार; 'या' स्टार किडची होतेय सर्वाधिक चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 18:52 IST2025-07-07T18:44:18+5:302025-07-07T18:52:56+5:30

अनेकदा चित्रपटांपेक्षा चाहत्यांना कलाकारांचं वैयक्तिक आयुष्य आणि कौटुंबीक जीवनाबद्दल जाणून घेण्यास प्रचंड उत्सुकता असते.

सोशल मीडियावर अनेकदा बॉलिवूड स्टार्सपेक्षा त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टार किड्सची चर्चा रंगत असते.

यामध्ये अनन्या पांडे, आलिया भट्ट,रणबीर कपूर हे स्टारकिड्स कायमच चर्चेत असतात. त्यात अलिकडच्या काळात राशा थडानी, इब्राहिम अली खान, शनाया कपूर तसेच जुनैद खान या स्टार किड्सनी इंडस्ट्रीत पदार्पण केलं,

परंतु, या सगळ्यामध्ये चर्चा झाली ती इब्राहिम अली खानची. सैफ अली खानच्या पावलांवर पाऊल ठेवतं त्याच्या लाडक्या लेकाने अभिनय क्षेत्रात एन्ट्री घेतली.

मात्र, त्याचा पहिलाच डेब्यू 'नादानियॉं' सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला. या चित्रपटाला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही.

त्यानंतर आता अमृता सिंग- सैफ अली खानचा लेक सरजमीन या चित्रपटातून ओटीटीवर पदार्पण करतो आहे.

या चित्रपटात काजोल, इब्राहिम अली खान आणि साऊथ सुपरस्टार पृथ्वीराजची मुख्य भूमिका आहे.

येत्या २५ जुलैला हा देशभक्तीवर आधारित असलेला सिनेमा हॉटस्टारवर प्रदर्शित केला जाणार आहे.

विशेष म्हणजे इब्राहिम या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता या चित्रपटातून इब्राहिम प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.