मोहनीश बहलची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री; पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 07:00 AM2022-02-24T07:00:00+5:302022-02-24T07:00:00+5:30

Mohnish bahl wife: मोहनीशच्या पत्नीने 'वास्तव' चित्रपटात काम केलं आहे. तसंच 'संजीवनी 2' या मालिकेतही तिने मोहनीशसोबत स्क्रीन शेअर केली आहे.

हम साथ साथ है हा चित्रपट कोणताही प्रेक्षक विसरु शकत नाही. एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारलेला हा चित्रपट त्याकाळी तुफान गाजला.

या चित्रपटात कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकार झळकले होते. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे मोहनीश बहल.

उत्तम अभिनयाच्या जोरावर मोहनीश बहलने कलाविश्वात त्याचं स्थान निर्माण केलं. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत त्याची लेक प्रनुतन बहलनेदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

मोहनीशच्या पत्नीचं नाव आरती बहल आहे. लग्नापूर्वी तिचं नाव एकता सोहोनी

एकतादेखील मोहनीशप्रमाणे अभिनेत्री असून तिने 'वास्तव' चित्रपटात काम केलं आहे. तसंच 'संजीवनी 2' या मालिकेतही तिने मोहनीशसोबत स्क्रीन शेअर केली आहे.

एकताने ‘सोलाह सतरा’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ती वंश, तहलका, साजन, नामचीन, वास्तव, लाईफ हो तो ऐसी या चित्रपटांमध्ये झळकली.

एकता सोशल मीडियावर सक्रीय असून कायम तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

एकताने शेअर केलेला फोटो