ऐकावं ते नवलच! घटस्फोट घेतल्यानंतर प्रेम फुललं; Ex पत्नीला डेट करतोय 'हा' बॉलिवूड अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 10:52 IST2026-01-07T10:34:57+5:302026-01-07T10:52:00+5:30

बॉलिवूडमधील मात्र एक असा अभिनेता जो घटस्फोट झाल्यावर पुन्हा एक्स पत्नीला डेट करत आहे. इतकंच नव्हे तो एक्स पत्नीशी पुन्हा लग्न करण्याच्या तो तयारीत आहे

बॉलिवूडमधील असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे एकमेकांच्या आकंठ प्रेमात असतात पण नंतर मात्र त्यांचा घटस्फोट होतो. पण आता मात्र एक असा अभिनेता जो घटस्फोट झाल्यावर पुन्हा एक्स पत्नीला डेट करत आहे.

हा अभिनेता आहे गुलशन देवैया. गुलशन देवैयाने २०२० मध्ये अभिनेत्री कॅलिरोई झियाफेटा (Kallirroi Tziafetta) हिच्याशी घटस्फोट घेतला होता.

मात्र, २०२४ मध्ये हे दोघे पुन्हा एकत्र आले असून सध्या ते एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गुलशनने सांगितले की, 'कपल्स थेरपी'मुळे त्यांना पुन्हा एकत्र येण्यास मदत झाली. घटस्फोटानंतर जोडप्याने घेतलेल्या या थेरपीमुळे त्यांचं मनपरिवर्तन होण्यास मदत झाली.

थेरपीमुळे त्यांना स्वतःमधील त्रुटी समजल्या आणि त्यांचं नातं अधिक परिपक्व झाले. भविष्यात आम्ही पुन्हा लग्न करु शकतो, अशी शक्यताही गुलशनने नाकारली नाही.

कॅलिरोई झियाफेटा ही सुद्धा एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ती रंगभूमीवरील काही नाटकांमध्ये काम करते. मे २०२५ मध्ये तिने गुलशनसोबत रोमँटिक फोटो शेअर केले होते, तेव्हापासून या चर्चा सुरु झाल्या.

गुलशन देवैया आणि कॅलिरोई हे दोघं घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी सर्वांसमोर सेकंड चान्सचा आदर्श ठेवला आहे.