लोकप्रिय अभिनेता आशिष विद्यार्थींची पत्नीदेखील आहे अभिनेत्री; बंगाली कलाविश्वात आहे त्यांचा दबदबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 17:17 IST2022-07-15T17:13:36+5:302022-07-15T17:17:22+5:30
Ashish vidyarthi: आशिष यांच्या पत्नीचं नाव राजोशी बरुआ असं असून त्या प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री शकुंतला बरुआ यांची लेक आहेत.

हिंदीसह तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी आणि हॉलिवूड चित्रपटांमध्ये नाव कमावलेला दिग्गज अभिनेता म्हणजे आशिष विद्यार्थी.

उत्तम अभिनयाच्या जोरावर आशिष विद्यार्थी यांनी कलाविश्वात त्यांचा स्वतंत्र असा चाहतावर्ग तयार केला आहे.

आशिष हे उत्तम अभिनेता असण्यासोबतच एक चांगले मोटिव्हेशनल स्पीकरदेखील आहेत.

आशिष कलाविश्वाप्रमाणे सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय असून बऱ्याचदा ते त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफविषयीचे अपडेट्सही नेटकऱ्यांना देत असतात.

सध्या सोशल मीडियावर त्यांच्या पत्नीची चर्चा रंगली आहे. आशिष विद्यार्थी यांची पत्नीदेखील त्यांच्याप्रमाणेच उत्तम अभिनेत्री आहे.

आशिष यांच्या पत्नीचं नाव राजोशी बरुआ असं असून त्या प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री शकुंतला बरुआ यांची लेक आहेत.

राजोशीदेखील लोकप्रिय बंगाली अभिनेत्री असून त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

आशिष बऱ्याचदा आपल्या पत्नी आणि मुलासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

सुहानी सी एक लडकी या हिंदी मालिकेतीही त्यांनी काम केलं आहे.

राजोशी सोशल मीडियावर सक्रीय असून कायम त्यांच्या सहकलाकारांसोबतचे फोटो पोस्ट करत असतात.

















