कुठे आहे 'यस बॉस' चा सिद्धार्थ चौधरी? बॉलिवूडपासून दूर गेल्यानंतरही जगतोय आलीशान लाइफ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 11:21 AM2022-01-04T11:21:23+5:302022-01-04T11:27:19+5:30

Aditya pancholi: या चित्रपटात आदित्य पांचोलीने सिद्धार्थ चौधरी ही भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे हा अभिनेता आज काल कुठे आहे असा प्रश्न अनेकांना पडतो.

अभिनेता शाहरुख खान आणि जुही चावला यांची मुख्य भूमिका असलेला येस बॉस चित्रपट आठवतो का? हा चित्रपट त्या काळी चांगलाच गाजला होता.

येस बॉस या चित्रपटात शाहरुख आणि जुही व्यतिरिक्त आणखी एक कलाकार झळकला होता. तो म्हणजे आदित्य पांचोली.

या चित्रपटात आदित्यने सिद्धार्थ चौधरी ही भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे हा अभिनेता आज काल कुठे आहे असा प्रश्न अनेकांना पडतो.

वयाच्या १८ व्या वर्षीच आदित्य पांचोली यांना यश, प्रसिद्ध सारं काही मिळालं होतं. परंतु, त्यांच्या स्वभावामुळे अनेकदा त्यांना करिअरमध्ये नुकसान सहन करावं लागलंय.

२००४ मध्ये संजय गुप्ता यांच्या मुसाफिर या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर ६ वर्षांनी स्ट्राइकर या अॅक्शनपटातही ते झळकले.

आदित्य पांचोली हे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटात अखेरचे दिसले. त्यानंतर त्यांचा कलाविश्वातील वावर कमी झाला.

आदित्य पांचोली यांचा मुलगा सूरज पांचोली कलाविश्वात सक्रीय आहे. तर, त्यांच्या लेकीचं सनाचं गोव्यात एक रेस्टॉरंट आहे.

अनेकदा आदित्य पांचोलीदेखील सनाच्या रेस्टॉरंटकडे लक्ष देतात.सध्या आदित्य पांचोली आणि त्यांची पत्नी जरीना हे मुंबईमध्येच राहतात. सोबतच त्यांचा मुलगा सूरजदेखीर राहतो. (photos: soorajpancholihero/ social media)