Ayesha Takia : चार वर्ष डेटिंग, धर्मांतर अन् प्लास्टिक सर्जरी...सलमानच्या खानच्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 12:10 PM2023-03-01T12:10:12+5:302023-03-01T12:23:20+5:30

राजकीय नेत्याच्या मुलाशी निकाह करुन या अभिनेत्रीने इस्लाम धर्म स्वीकारला. काही दिवसांपूर्वी प्लास्टिक सर्जरी केल्यामुळे ती ट्रोलही झाली.

सलमान खानच्या 'वॉंटेड' सिनेमातून सर्वांचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री आएशा टाकिया बऱ्याच वर्षांपासून रुपेरी पडद्यावरुन गायब आहे.

वॉंटेड, टार्झन द वंडर कार,दिल मांगे मोर, डोर अशा काही सिनेमांमधून आएशाने अभिनयाचा जलवा दाखवला. तिच्या अभिनयावर आणि रुपावर चाहते घायाळ झाले होते. मात्र ती अचानक गायब झाली.

याचं कारण म्हणजे आएशाने २००९ मध्ये समाजवादी पार्टीचे नेता अबु आजमी यांचा मुलगा फरहान आजमीशी निकाह केला. तेव्हा ती फक्त २३ वर्षांची होती.

फरहान आजमी एक बिझनेसमन आहे आणि त्याचे मुंबईत हॉटेलही आहे. असं म्हणतात तेव्हा आएशा अनेकदा त्याला हॉटेलवर भेटायची. मात्र तिने नातं लपवून ठेवलं होतं.

२००५ सालापासूनच दोघांमध्ये भेटीगाठी व्हायच्या. मात्र तेव्हा दोघांनी याचा सार्वजनिक स्वीकार केला नाही. तरी दोघे डेटिंग करत आहेत हे स्पष्ट होते.

२००९ मध्ये तिने फरहान सोबत निकाह करत इस्लाम धर्माचाही स्वीकार केला. आपले चमकते करिअर सोडून तिने निकाह करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता.

आज त्यांच्या लग्नाला १४ वर्ष झाली आहेत. भले ही ती मायानगरीपासून दूर आहे तरी ती सोशल मीडियावर कायम अॅक्टीव्ह असते.

२०१३ साली तिने मुलाला जन्म दिला. त्याचे नाव मिकेल असे ठेवण्यात आले. आपल्या क्युट मुलासोबतही तिने फोटो शेअर केले आहेत.

काही वर्षांपूर्वी आएशाने सर्जरी केली. यानंतर तिला ओळखणेही कठीण झाले होते. सोशल मीडियावर तिली चांगलेच ट्रोल करण्यात आले.