असरानी यांची पत्नीही आहे प्रसिद्ध अभिनेत्री; बॉलिवूडचा एक काळ गाजवलाय, लग्नानंतर सोडला अभिनय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 12:49 IST2025-10-21T12:37:13+5:302025-10-21T12:49:05+5:30
असरानी यांचं निधन झालं. त्यांची पत्नीही दिग्गज अभिनेत्री असून असरानींना पत्नीची खंबीर साथ होती.

ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी (Govardhan Asrani) यांचं काल (२० ऑक्टोबर) निधन झालं. असरानी यांची पत्नीही प्रसिद्ध अभिनेत्री आहे, हे फार कमी जणांना माहित असेल.
असरानींच्या पत्नीचं नाव आहे मंजू असरानी. असरानी आणि मंजू यांची लव्ह स्टोरी बॉलिवूडच्या चित्रपटांपेक्षा कमी नव्हती.
अभिनेत्री मंजू असरानी (माहेरचं नाव मंजू बन्सल) या स्वतः एक उत्तम अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
'आज की ताजा खबर' (१९७३) आणि 'चला मुरारी हीरो बनने' (१९७७) यांसारख्या चित्रपटांत मंजू यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या.
असरानी आणि मंजू यांची पहिली भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली. विशेष म्हणजे, ही भेट अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या 'दो अंजाने' चित्रपटाच्या सेटवर झाली होती.
मंजू असरानी यांनी लग्नानंतर लवकरच बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. मंजू यांना कुटुंबाला अधिक वेळ द्यायचा होता आणि मुलांकडे लक्ष द्यायचं होतं, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला.
मंजू यांनी १९८० मध्ये 'हम नहीं सुधरेंगे' या चित्रपटात काम केलं. जो असरानी यांनीच दिग्दर्शित केला होता. यानंतर त्या चित्रपटांपासून पूर्णपणे दूर राहिल्या.