प्रकाशझोतापासून दूर असलेली अर्जुन रामपालची लेक ठरतीये नॅशनल क्रश; स्टार किड्सवर पडतीये भारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 13:03 IST2022-06-13T12:56:17+5:302022-06-13T13:03:35+5:30
Arjun rampal daughter: अलिकडेच त्याने त्याच्या लेकीसोबतचा एक फोटो शेअर केला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्या मुलीविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करणारा अभिनेता म्हणजे अर्जुन रामपाल. सुरुवातीच्या काळात अर्जुन त्याच्या अभिनयामुळे चर्चेत येत होता. मात्र, हळूहळू त्याची क्रेझ कमी झाली.
सध्या कलाविश्वात अर्जुनचा वावर कमी झाला आहे. मात्र, आजही तो त्याच्या स्टाइल आणि लुक्समुळे चर्चेत येत असतो.
बऱ्याचदा फिटनेसमुळे चर्चेत येणारा अजून गेल्या काही काळापासून त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत येत आहे.
अर्जुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून वरचेवर त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतो
अलिकडेच त्याने त्याच्या लेकीसोबतचा एक फोटो शेअर केला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्या मुलीविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
अर्जुन रामपाल याला तीन मुलं आहेत. त्यामुळे तो कायम त्याच्या मुलांसोबत फोटो शेअर करत असतो. पण सध्या त्याची लेक मायरा हिची चर्चा रंगली आहे.
मायरा अर्जुनची थोरली लेक असून तिचा सोशल मीडियावर फारसा वावर नाही. मात्र, अर्जुन वरचेवर तिचे फोटो शेअर करत असतो.
मायरा, अर्जनुच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे. सध्या अर्जुन गॅब्रिएला हिला डेट करत आहे.
मायरा सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत असून ती अन्य स्टारकिडवर मात करत असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतंच मायराने तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट पब्लिक केलं आहे. त्यामुळे हळूहळू तिचे फॉलोअर्स वाढताना दिसत आहेत.