मलायका अरोरासोबतच्या नात्यावर अर्जुन कपूरचा मोठा खुलासा, म्हणाला - 'आता रात्री...'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 04:37 PM2023-01-17T16:37:34+5:302023-01-17T16:43:09+5:30

Malaika Arora And Arjun Kapoor : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर त्यांच्या रिलेशनशीपमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असतात. नुकतेच एका मुलाखतीदरम्यान अर्जुनने मलाइकाला डेट करण्याबाबत एक मोठी गोष्ट सांगितली आहे.

बोनी कपूर यांचा मोठा मुलगा आणि अभिनेता अर्जुन कपूर सध्या त्याच्या 'कुत्ते' चित्रपटाच्या प्रमोशनमुळे मीडियाशी संवाद साधतो आहे. त्याच्या प्रमोशनल मुलाखतींमध्ये, अभिनेत्याने काम तसेच त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

असाच एक प्रश्न होता की मलायकाने आपल्या आयुष्यात काय बदल घडवून आणले आहेत आणि अर्जुनला तिला डेट केल्यानंतर काय नवीन वाटते.

यावर अर्जुनने उत्तरात सांगितले की, मलायकाला डेट केल्यानंतर आता तो रात्री शांतपणे झोपू शकतो.

मलायकाने त्याच्या आयुष्यात एन्ट्री केल्यानंतर त्याला रात्री शांत झोप लागते. तो म्हणतो की तो जेव्हा झोपायला जातो आहे आणि सकाळी उठतो तेव्हा तो आनंदी असतो आणि याचे श्रेय मलायकाला जाते.

अर्जुन कपूरचा चित्रपट 'कुत्ते' नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद मिळत आहे.

मात्र मलायकाला त्याचा चित्रपट खूप आवडला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे चित्रपट आणि अर्जुनच्या कामाचे कौतुक केले होते.

मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.