अपारशक्ती खुराणा असा खरेदी करायचा कंडोम, स्वत: केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 05:00 PM2021-08-26T17:00:13+5:302021-08-26T17:06:42+5:30

आता अपारशक्ती डिजिटल डेब्यू करतोय. त्याची चर्चा आहेच. पण त्याशिवाय आणखी एका गोष्टीची चर्चा आहे...

आयुष्मान खुराणाचा भाऊ अपारशक्ती खुराणा हा सुद्धा बॉलिवूडचा एक गुणी अभिनेता.

दंगल, बद्रीनाथ की दुल्हनिया, लुकाछुपी, जबरीया जोडी, पती पत्नी और वो अशा अनेक चित्रपटांतील त्याच्या सहायक भूमिका प्रचंड गाजल्या.

आता अपारशक्ती डिजिटल डेब्यू करतोय. त्याची चर्चा आहेच. पण त्याशिवाय आणखी एका गोष्टीची चर्चा आहे.

होय, दुकानात कंडोम खरेदी करतानाचा एक अनुभव अपारशक्तीने एका मुलाखतीत शेअर केला आहे.

कंडोम खरेदी करताना पुरूषांनाही संकोच वाटतो. अपारशक्तीही याला अपवाद नव्हता. याचाच खुलासा त्याने केलाये.

चंदीगडमध्ये असताना मी कंडोम खरेदी करायला जायचो. पण कंडोम मागताना लाजायचो. यासाठी डिलिव्हरी बॉयसारखे डोक्यावर हेल्मेट घालून मी दुकानात शिरायचो आणि कंडोम घेऊन बाईकवरून निघून जायचो, असे त्याने सांगितले.

त्याचा ओटीटीवरचा आगामी सिनेमा कंडोम याच विषयावर आधारित आहे. हेल्मेट असे या चित्रपटाचे नाव आहे.

कंडोम खरेदी करताना पुरुषांना प्रचंड संकोच वाटतो. त्यासाठी कोणकोणत्या युक्त्या वापरल्या जातात यावर आधारित हा चित्रपट आहे.

या थ्रिलर कॉमेडी चित्रपटात अपारशक्ती खुराना, प्रनूतन बहाल आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

येत्या 3 सप्टेंबरला झी फाईव्हवर हा सिनेमा प्रदर्शित होतोय. कंडोम हा विषय अतिशय मनोरंजक पद्धतीने या सिनेमात मांडण्यात आला आहे.