Animal : 'ॲनिमल'साठी रणबीरने घेतले ७० कोटी, तर तृप्ती डिमरीला मिळाले फक्त काही लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 04:16 PM2023-12-05T16:16:04+5:302023-12-05T16:36:33+5:30

'ॲनिमल'साठी घेतलेल्या मानधनाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. रणबीर कपूरला बॉबी देओलपेक्षा १४ पट मानधन मिळाल्याची चर्चा आहे.

रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेला 'ॲनिमल' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. टीझरपासूनच या सिनेमाची सर्वत्र चर्चा होती.

संदीप वांगा दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमातील कलाकारांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

या चित्रपटाबरोबरच कलाकारांनी 'ॲनिमल'साठी घेतलेल्या मानधनाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. रणबीर कपूरला बॉबी देओलपेक्षा १४ पट मानधन मिळाल्याची चर्चा आहे.

'ॲनिमल' सिनेमात रणविजय साकारण्यासाठी रणबीर कपूरने तब्बल ७० कोटी मानधन घेतलं आहे.

या सिनेमातील बॉबी देओलच्या भूमिकेचंही सर्वत्र कौतुक होत आहे. 'ॲनिमल'मधील भूमिकेसाठी त्याला ४-५ कोटी मिळाल्याची माहिती आहे.

तर रश्मिका मंदानाने गीतांजली हे पात्र साकारण्यासाठी ४ कोटी रुपये फी घेतली आहे.

रणबीर कपूरच्या वडिलांच्या भूमिकेत असलेल्या अनिल कपूर यांनीही 'ॲनिमल'साठी २ कोटी घेतल्याची माहिती आहे.

'ॲनिमल' सिनेमात रणबीरबरोबर इंटिमेट सीन्स देऊन चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे तृप्ती डिमरी. या सिनेमानंतर तिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे.

'ॲनिमल'मुळे नॅशनल क्रश बनलेल्या तृप्तीने या सिनेमासाठी ४० लाख रुपयांचं मानधन घेतलं आहे.

दरम्यान, 'ॲनिमल' सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. या सिनेमाने अवघ्या चारच दिवसांत भारतात २४१ कोटींचा गल्ला जमवला आहे.