तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 21:10 IST2024-10-11T20:54:39+5:302024-10-11T21:10:20+5:30

Tripti Dimri Glamorous Photos: अँनिमल सिनेमापासून चर्चेत असलेल्या तृप्तीचा नवा लूकदेखील फॅन्सना आवडलाय

अँनिमल या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली तृप्ती डिमरी ही सध्या बॉलिवूडमध्ये सर्वात चर्चेत असलेली अभिनेत्री आहे.

'अँनिमल'नंतर तिने 'बॅड न्यूज' सिनेमात अभिनय केला. सध्या मात्र ती 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

तृप्ती डिमरीने आधी 'कला', 'बुलबुल', 'लैला मजनू' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले, पण तिला अपेक्षित लोकप्रियता मिळाली नाही.

तृत्पी आता हळूहळू चर्चेचा विषय ठरताना दिसतेय. पण लोकप्रियता एन्जॉय करतानाच ती सोशल मीडियावरही सक्रीय आहे.

तृप्ती डिमरीने नुकतेच काही फोटो पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीच्या ताज्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलंय.

सध्या सर्वत्र तृप्तीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. तिच्या ताज्या फोटोशूटमधील स्पेशल लूकला चाहत्यांनी भरभरून लाईक्स अन् कमेंट्सचे प्रेम दिले आहे.

सर्व फोटो सौजन्य- तृप्ती डिमरी इन्स्टाग्राम (Triptii Dimri Instagram)