अनिल कपूरच्या धाकट्या लेकीला पाहिलंय का? अभिनयापासून दूर, तरीही कमावतेय कोट्यावधींची संपत्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 13:08 IST2026-03-05T12:35:26+5:302026-03-05T13:08:44+5:30
अनिल कपूर बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता. अनिल कपूरची लेक सोनम कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे आपल्याला माहितच आहे. पण अनिल कपूरची धाकटी लेक लाईमलाईटपासून दूर असली तरीही आर्थिकदृष्ट्या यशस्वी आहे.

अनिल कपूर बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता. अनिल कपूरची लेक सोनम कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे आपल्याला माहितच आहे. पण अनिल कपूरची धाकटी लेक लाईमलाईटपासून दूर असली तरीही आर्थिकदृष्ट्या यशस्वी आहे.

अनिल कपूरची धाकटी बहीण रिया कपूर हिने ग्लॅमर विश्वापासून दूर राहून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज रिया कपूरचा वाढदिवस असून तिच्याबद्दल जाणून घेऊ.

रिया कपूरने कधीही अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहिले नाही, मात्र चित्रपट निर्मिती आणि फॅशनच्या जगात तिने आपला दबदबा निर्माण केला आहे

रिया कपूरची एकूण संपत्ती अंदाजे १० ते १५ कोटी रुपयांच्या आसपास आहे. जरी ही रक्कम तिचे वडील किंवा बहिणीच्या तुलनेत कमी वाटत असली, तरी तिने स्वतःच्या हिंमतीवर ही संपत्ती उभी केली आहे.

रिया कपूर एक यशस्वी निर्माती आहे. तिने 'आयशा', 'खूबसूरत' आणि 'वीरे दी वेडिंग' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. अलीकडेच आलेल्या 'क्रू' या चित्रपटाच्या यशाने तिला बॉक्स ऑफिसवर यशाची गोडी चाखता आली.

रिया आणि सोनम कपूर यांचा 'ऱ्हेसन' (Rheson) नावाचा स्वतःचा फॅशन ब्रँड आहे. या ब्रँडमधून तिला मोठी कमाई होते. बॉलिवूडमध्ये सोनम कपूरला 'फॅशन आयकॉन' बनवण्यामागे रियाचा मोठा हात आहे. ती अनेक बड्या सेलिब्रिटींसाठी स्टायलिस्ट म्हणून काम करते.

रिया कपूरला महागड्या गाड्यांची आणि ब्रँडेड कपड्यांची खूप आवड आहे. तिने २०२१ मध्ये तिचा प्रियकर करण बुलानीसोबत आलिशान थाटात लग्न केले.

















