साऊथच्या या अभिनेत्यांपुढे 'बॉलिवूड'ही फिके; सगळेच प्रायव्हेट जेटचे मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 04:22 PM2022-10-07T16:22:49+5:302022-10-07T16:39:29+5:30

रिपोर्टनुसार, अनेक साऊथ स्टार्स आहेत ज्यांचेकडे प्रायव्हेट जेट आहे ज्याची किंमत 50 ते 80 कोटी आहे.

अलीकडच्या काळात साउथमधील अनेक चित्रपट आले आहेत ज्यात ते मोठ्या पडद्यावर लार्जर दॅन लाइफच्या भूमिकेत दिसले आहेत. खऱ्या आयुष्यातही हे स्टार्स आलिशान आयुष्य जगतात. त्याच्याकडे महागड्या गाड्यांपासून ते प्रायव्हेट जेटपर्यंत सर्व काही आहे. रिपोर्टनुसार, अनेक साऊथ स्टार्स आहेत ज्यांचे स्वतःचे जेट आहे ज्याची किंमत 50 ते 80 कोटी आहे.

लायगर फेम अभिनेता विजय देवरकोंडा लग्झरी लाईफस्टाईलसाठी ओळखला जातो. विजय पर्सनल आणि कुटुंबासोबत प्रवास करताना प्रायव्हेट जेटनं करतो. (फोटो इन्स्टाग्राम)

मेगा स्टार राम चरणही प्रायव्हेट जेटनं प्रवास करणे पसंत करतो. तो पत्नी उपासना कोनिडेलासोबत प्रायव्हेट जेट ट्रिपला जाताना दिसतो. (फोटो इन्स्टाग्राम)

पुष्पा स्टार अल्लू अर्जुनचे स्वतःचे प्रायव्हेट जेट आहे आणि तो प्रायव्हेट जेटमध्ये कुटुंबासह प्रवास करताना अनेकदा दिसला आहे.(फोटो इन्स्टाग्राम)

तेलुगू स्टार चिरंजीवी चित्रपटाच्या प्रमोशमनसाठी आणि कुटुंबासोबत व्हॅकेशनवर जाताना चार्टर विमानाने प्रवास करतात. (फोटो इन्स्टाग्राम)

साऊथ सुपरस्टार नागार्जुनची फॅन फॉलोइंग कोणापासून लपलेली नाही. नागार्जुनकडे स्वतःचे प्रायव्हेट जेट आहे.(फोटो इन्स्टाग्राम)