हरीलाल गांधींच्या भूमिकेत अक्षय खन्ना; आजही अजरामर आहे 'हा' सिनेमा, तुम्ही पाहिलाय?
By देवेंद्र जाधव | Updated: March 13, 2025 13:45 IST2025-03-13T13:19:31+5:302025-03-13T13:45:45+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या मुलाच्या भूमिकेत अक्षय खन्ना झळकला. अभिनेत्याने साकारलेल्या या भूमिकेचंही चांगलंच कौतुक झालं पण...

अक्षय खन्नाने 'छावा' सिनेमात औरंगजेबाची भूमिका साकारली. अक्षय खन्नाने साकारलेली ही भूमिका चांगलीच गाजतेय. पण आज आम्ही तुम्हाला अक्षय खन्नाच्या अशाच एका अजरामर भूमिकेविषयी सांगणार आहे
अक्षय खन्नाने साकारलेली ही भूमिका म्हणजे हरिलाल गांधी. एका सिनेमात महात्मा गांधींचा थोरला लेक हरीलाल गांधीची भूमिका अक्षयने साकारली होती.
'गांधी माय फादर' सिनेमात अक्षयने ही भूमिका साकारली होती. आदर्श व्यक्तिमत्वाच्या मुलाची कशी अधोगती होत जाते, हे या सिनेमातून पाहायला मिळतंं.
आफ्रिकेत गांधींनी जी चळवळ उभारली त्यावेळी त्यांचा मुलगा हरीलालने त्यांना साहाय्य केलं होतं. तिथून या सिनेमाची सुरुवात होते.
गांधींच्या आदर्शाच्या ओझ्याखाली दबून हरीलाल पुढे वाईट मार्गाला लागतो. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याचं तो कसं नुकसान करतो, याची हृदयद्रावक कहाणी सिनेमात दिसते.
'गांधी माय फादर' सिनेमात दर्शन जरीवाला यांनी महात्मा गांधींची भूमिका साकारली होती तर शेफाली शाहने कस्तुरबा गांधींची भूमिका साकारली होती.
'गांधी माय फादर' सिनेमात हरीलाल गांधींच्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री भूमिका चावला झळकली. विशेष म्हणजे या सिनेमाची निर्मिती अभिनेते अनिल कपूर यांनी केली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलेला पण अक्षय खन्नाचा अभिनय मात्र गाजला.