अक्षय कुमारच्या 'राम सेतू' नवं पोस्टर रिलीज, जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा महत्त्वाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 03:41 PM2022-10-08T15:41:43+5:302022-10-08T15:54:16+5:30

राम सेतू या चित्रपटात अक्षय कुमारने एका पुरातत्व शास्त्रज्ञाची भूमिका साकारली आहे.

अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी 'राम सेतू' या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

चित्रपटाचे पोस्टर चार भाषांमध्ये रिलीज करण्यात आले असून, अक्षय कुमार राम सेतूमुळे खूप चर्चेत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

राम सेतू या चित्रपटात अक्षय कुमारने एका पुरातत्व शास्त्रज्ञाची भूमिका साकारली आहे. राम सेतू नैसर्गिक आहे की मानवनिर्मित, याचा तपास तो चित्रपटात करत असतो. (फोटो इन्स्टाग्राम)

अक्षय कुमारने राम सेतू चित्रपटात अनेक अॅक्शन सीन्स दिले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

अक्षयसोबत जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा यांच्यादेखील भूमिका आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

अभिषेक शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट २४ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.(फोटो इन्स्टाग्राम)