फरहान अख्तरशी विवाह केल्यानंतर शिबानी दांडेकरने सोशल मीडियावर बदललं आपलं नाव, आता या नावाने ओखळली जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 11:50 AM2022-02-23T11:50:09+5:302022-02-23T11:53:40+5:30

Shibani Dandekar-Farhan Akhtar Marriage : अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर काही दिवसांपूर्वी लग्न केले. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत झालेल्या या विवाह सोहळ्याला काही सेलेब्रिटी आणि कुटुंबातील मंडळी उपस्थित होती.

अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर काही दिवसांपूर्वी लग्न केले. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत झालेल्या या विवाह सोहळ्याला काही सेलेब्रिटी आणि कुटुंबातील मंडळी उपस्थित होती.

शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर यांनी १९ फेब्रुवारी रोजी विवाह केला.

आता विवाहानंतर शिबानी दांडेकरने इन्स्टाग्रामवर आपल्या नावासमोर फरहान अख्तरचं आडनाव लावलं आहे. आता तिचं नाव शिबानी दांडेकर-अख्तर आहे. त्याच्यासोबत बायोमध्ये मिसेस अख्तर लिहिले आहे.

हल्लीच शिबानी आणि फरहान यांच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर आले होते. ज्यामध्ये शिबानी आणि फरहान अख्तर हातात मेहंदी लावलेले दिसत होते.

शिबानीने विवाहामध्ये रेड कलरचा गाऊन परिधान केला होता. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. तर फरहानने ब्लॅक कलरचा सूट परधान केला होता.

शिबानी आणि फरहान अख्तर बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. तसेच त्यांनी आता विवाह करून नात्याला अधिकृत रूप दिले आहे.