अभिनेत्री उर्वशी रौतेलानं सांगितला ट्रोलिंग हाताळण्याचा महामंत्र, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 16:51 IST2024-06-04T16:29:18+5:302024-06-04T16:51:52+5:30

अभिनेत्री उर्वशी रौतेला हिला कायम ट्रोल केलं जातं. अलिकडेच एका मुलाखतीत अभिनेत्रीने ट्रोलिंग हाताळण्याचा सोपा मार्ग सांगितला.
नुकतेच उर्वशीने आयएएनएसला सांगितलं, 'मला वाटत की ट्रोलिंगला सामोरे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्या गोष्टींचा विचारच करु नये'.
उर्वशीच्या मते, 'जेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देत नाही, तेव्हा ट्रोल होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि ती या सर्व गोष्टींकडे लक्ष देत नाही'.
उर्वशी रौतेला तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.
तिने अनेक सिनेमांमध्ये काम देखील केलं आहे.
सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
उर्वशी तिच्या अनोख्या स्टाईलमुळे नेहमी चाहत्यांच्या पसंतीस उतरते. तिने शेअर केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
उर्वशी रौतेलाने 23 ऑगस्ट 2023 रोजी 'क्रिकेट वर्ल्ड कप 2023' च्या ट्रॉफीचे अनावरण केलं. असं करणारी उर्वशी पहिली अभिनेत्री ठरली होती.
नेहमीच्या महागड्या गोष्टींमुळेच उर्वशी रौतेलाला ‘फॅशन दिवा’ म्हणून संबोधले जाते.
र्वशीला म्हणावं तसं यश बॉलिवूडमध्ये मिळालं नाही पण असं असताना ही अभिनेत्री लक्झरी लाइफ जगते. सध्या चाहते तिच्या नव्या सिनेमाची वाट पाहत आहेत.