मालदीवच्या समुद्रकिनारी तमन्नाच्या अदा! बॉयफ्रेंड विजय वर्मासोबत घेतला सुट्ट्यांचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 11:41 AM2023-09-01T11:41:14+5:302023-09-01T12:05:03+5:30

तमन्ना भाटियाच्या मालदिव्ह्जमधील फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

ग्लॅमरस अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannah Bhatia) गेल्या काही दिवसांपासून प्रोफेशनल आणि पर्सनल दोन्ही कारणांनी चर्चेत आहे. 'लस्ट स्टोरी 2' असो किंवा 'जी करदा' वेब सिरीज आणि नुकताच रिलीज झालेला 'जेलर' सिनेमामुळे तिचं प्रोफेशनल लाईफ जोरात सुरु आहे.

'बाहुबली' फेम तमन्ना भाटिया आणखी एका कारणाने चर्चेत आहे ते म्हणजे विजय वर्मासोबतची (Vijay Varma) रिलेशनशिप. गेल्या काही महिन्यांपासून तमन्ना आणि विजय एकमेकांसोबत दिसत आहेत. दोघेही हातात हात धरुन अनेक इव्हेंट्समध्ये हजेरी लावत आहेत.

आजकाल प्रत्येक कपल मालदीव्ह्जची ट्रीप करताना दिसतात. विकी-कॅटरिना, विजय देवरकोंडा-रश्मिका मंदाना सह अनेक कपल्सचं मालदीव्ह्ज हे ठरलेलं डेस्टिनेशन आहे. नुकतंच तमन्ना आणि विजयही दोघेही मालदीव्ह्जमध्ये सुट्टी एन्जॉय करुन परतले आहेत.

मालदीव्ह्जमधील तमन्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. बेबी पिंक बिकीनीमध्ये तिने मालदीव्ह्जच्या समुद्रकिनारी डान्स करतानाचा एक छानसा फोटो पोस्ट केला आहे. तर आकाशात सुंदर इंद्रधनुष्य तयार झालं आहे. हे मनमोहक दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

दुसऱ्या फोटोत तमन्ना चॉकलेटी रंगाच्या टॉपमध्ये दिसत आहे. तर कानात मोठ्या रिंग्स घातल्या आहेत. केस मोकळे सोडले आहेत. मालदीव्ह्जच्या उन्हात तमन्नाचं सौंदर्य आणखी खुललं आहे.

आणखी एका फोटोत तमन्ना रेतीत खेळताना दिसत आहे. तिने चॉकलेटी रंगाचा स्लीव्हलेस शोल्डर स्ट्रीप वनपीस घातला आहे. तर डोळ्यावर गॉगल लावला आहे. रेतीत झोपून ती लहान मुलांसारखीच बीचवर खेळण्याचा आनंद घेताना दिसत आहे.

मालदीव्ह्जला ती ज्या व्हिलावर राहिली तिथेच बाहेर कॉफी पितानाचा फोटोही चाहत्यांना आवडला आहे. प्रिंटेड डीप नेक वनपीसमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. त्यातच सूर्याची किरणं आल्याने तिच्या सौंदर्यात आणखी भर पडत आहे.

कामातून ब्रेक घेत तिने मालदीव्ह्जमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतला. 'ऑफ ड्युटी' अशी एक हॅट घातलेला फोटोही तिने पोस्ट केला. यामध्ये तिने हॅटमधून आपला चेहरा झाकला आहे.

नारळाची झाडं, रेती अशा निसर्गरम्य वातावरणात झोपाळ्यावर आराम करण्याची संधी कोण सोडेल. तमन्नाचा झोपाळ्यावर 'मी टाईम' घालवतानाचा क्षणही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.