वयाच्या ११व्या वर्षी वडील झाले शहीद, आईला सोबत घेऊन गाठली दिल्ली अन् 'अभिनेत्री' बनली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 17:26 IST2025-03-13T17:11:50+5:302025-03-13T17:26:47+5:30
अभिनेत्रीने गेल्याच वर्षी वडिलांच्या ७२ व्या जयंतीला त्यांच्या स्मारकाचं उद्घाटन केलं.

मनोरंजनसृष्टीत येण्यासाठी अनेक कलाकारांनी बराच संघर्ष केला आहे. अभिनेता किंवा अभिनेत्री होण्याचं स्वप्न बाळगून अनेक कलाकार गावातून मुंबईत आले.
अशीच एक अभिनेत्री आहे निम्रत कौर(Nimrat kaur) जी मध्यंतरी अभिषेक बच्चनमुळे चर्चेत आली. अभिषेकसोबत तिचं नाव जोडलं गेलं. निम्रत कौरने लहानपणापासूनच मोठा संघर्ष पाहिला आहे.
निम्रत कौरचे वडील आर्मी ऑफिसर होते. ती ११ वर्षांची असतानाच वडील काश्मीरमध्ये पोस्टिंग असताना शहीद झाले. यानंतर निम्रतची आई दोन्ही मुलींना घेऊन राजस्थानमधील पिलानी गावातून निघाली आणि नोएडामध्ये शिफ्ट झाली.
निम्रतने दिल्लीत शिक्षण घेतलं. कुटुंबाचा खर्च आणि शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी ती मॉडेलिंग क्षेत्रात आली. दिल्लीत असताना तिने अनेक मॉडेलिंग असाईनमेंट्स केल्या.
यातूनच तिला मुंबईत येऊन करिअर करण्याचा विचार आला. २००४ साली ती मुंबईत आली आणि सोनू निगमच्या म्युझिक व्हिडिओतून तिने अभिनयाला सुरुवात केली.
निम्रतने थिएटर करायला सुरुवात केलं. २०१२ मध्ये आलेल्या 'पेडलर्स' मध्ये तिने दमदार भूमिका साकारली. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाचा प्रीमिअरही झाला आणि निम्रतला ओळख मिळाली.
२०१३ मध्ये 'द लंचबॉक्स' सिनेमाने तिचं नशीबच पालटलं. या सिनेमात तिने इरफान खानसोबत स्क्रीन शेअर केली. तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. सिनेमाला अनेक अवॉर्ड्सही मिळाले.
निम्रतने नंतर अमेरिकन टीव्ही शो होमलँडमध्येही काम केलं. 'दसवी' सिनेमात तिने अभिषेक बच्चनसोबत स्क्रीन शेअर केली. याच सिनेमानंतर तिचं नाव अभिषेकसोबत जोडलं गेलं.
निम्रतने वडिलांच्या ७२ व्या जयंतीला त्यांच्या स्मारकाचं उद्घाटन केलं. याचे फोटो पोस्ट करत तिने भावना मांडल्या होत्या.