Esha Gupta चे ब्लॅक अँड व्हाइट फोटो; सिझलिंग स्टाईलवर चाहते झाले फिदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 04:43 PM2023-01-30T16:43:01+5:302023-01-30T16:53:19+5:30

Esha Gupta : फोटोंमध्ये ईशा गुप्ता अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती नेहमीच आपल्या बोल्ड फोटोंमधून सर्वांचे लक्ष वेधून घेते.

ईशा गुप्ताने इन्स्टाग्रामवर आपले काही बोल्ड फोटो शेअर करून इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. तिने आपले काही ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केले आहेत.

फोटोंमध्ये ईशा गुप्ता अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. डीप नेक टॉपमधील ईशा गुप्ताची सिझलिंग स्टाइल चाहत्यांना वेड लावत आहे.

ईशा गुप्ताचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काल ईशाने दोन फोटो शेअर केले होते, तर आज आणखी काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

ईशा गुप्ताच्या या फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. ईशा गुप्ता 37 वर्षांची आहे, पण तिच्या हॉटनेसमध्ये कोणतीही कमी नाही.

ईशा गुप्ताने जन्नत-२ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटासाठी ईशा गुप्ताला फिल्मफेअर पुरस्कारात बेस्ट फिमेल डेब्यूचे नॉमिनेशन मिळाले होते.

ईशा गुप्ता एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झालेल्या नकाब या वेब सीरिजमध्ये पोलिस महिला अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली होती.

याशिवाय, वेब सीरिज आश्रम-३ मध्ये ईशा गुप्ता दिसली होती. यामध्ये तिचा बोल्ड अवतार सर्वाधिक चर्चेत होता.