पावडरच्या जाहिरातीतून उजळलं नशीब, बॉलिवूडसह टॉलिवूडही गाजवलं; सलमानच्या नायिकेनं योगा टीचरसोबत संसार थाटला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 14:19 IST2026-05-20T14:06:33+5:302026-05-20T14:19:10+5:30
सलमानसोबत हिट सिनेमा देऊनही फायदा नाही झाला, अभिनेत्री बॉलिवूड सोडून साऊथकडे वळली, योगा टीचरसोबत लग्न करून जगतेय 'असं' आयुष्य

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून येवून हिंदी चित्रपटसृष्टीतही स्थिरावणाऱ्या काही मोजक्या अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे भूमिका चावला.'तेरे नाम', 'रन', 'दिल ने जिस अपना कहा', 'फॅमिली' आणि 'गांधी, माय फादर' यासारख्या हिंदी चित्रपटांमुळे हिंदी सिनेरसिक तिला ओळखतात.

भूमिका चावलाचा जन्म २१ ऑगस्ट १९७८ ला नवी दिल्लीत एका पंजाबी कुटुंबात झाला, तिचे वडील निवृत्त लष्करी अधिकारी होते. तिचं शालेय शिक्षण नवी दिल्लीत झालं आहे.

अगदीच किशोर वयात तिने 'हिप हिप हुर्रे' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पाऊल ठेवलं. पण हिंदी चित्रपटसृष्टीत येण्याची संधी दिसत नसल्याने तिने दक्षिणात्य चित्रपटीकडे आपला मोर्चा वळवला.

२००० साली 'युवाकुडू' या तेलगू चित्रपटातून तिने दाक्षिणात्य सिनेविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर तिला २००१ मध्ये आलेल्या'कुशी' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात पवन कल्याणसोबत तिने स्क्रिन शेअर केली. या चित्रपटाने भूमिकाला अभिनेत्री म्हणून यश मिळवून दिले.

२००३ मध्ये सलमान खानसोबत 'तेरे नाम "या चित्रपटातून भूमिकाने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. हा चित्रपट तिच्या कारकिर्दीतील यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला. तेरे नाम हा सिनेमा त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटासाठी भूमिकाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पदार्पण या पुरस्काराने गौरविण्यात आलं.

आजवर भूमिका चावलाने तेलगू, तामिळ, हिंदी, भोजपुरी, कन्नड आणि पंजाबी चित्रपटसृष्टीत विविध भूमिका साकारल्या आहेत.

वैयक्तिक आयुष्यात भूमिका चावला हिने योग शिक्षक भरत ठाकूर यांच्याशी २१ ऑक्टोबर २००७ रोजी प्रेमविवाह केला. त्यांना एक मुलगा आहे.लग्नापूर्वी दोघेही जवळपास ४ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते

सध्या ती सिनेमांमध्ये फारशी सक्रिय नसली तरी तिचे लाखो चाहते आहेत. आणि भूमिका तिच्या आयुष्यात प्रचंड खुश आहे.

















