'गजनी' फेम अभिनेत्री असिनने लेकीचं नाव ठेवलंय 'अरिन', आडनाव मात्र दिलंच नाही; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 03:15 PM2023-10-26T15:15:09+5:302023-10-26T15:21:41+5:30

मुलीला आडनाव न देण्याचं कारण काय?

'गजनी' फेम अभिनेत्री असिन (Asin) आता कुठे आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. आज असिन 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. लग्नानंतर असिन फिल्मइंडस्ट्रीत एकाएकी गायबच झाली. तिच्याबद्दल या गोष्टी माहितीयेत का?

असिनचा जन्म 26 ऑक्टोबर 1985 साली झाला. तिचे वडील जोसेफ थोट्टूकमल हे निवृत्त सीबीआय ऑफिसर होते आणि त्यांचा बिझनेसही आहे. तर तिची आई सेलिन ही सर्जन आहे. त्यांनी असिनच्या करिअरला पूर्ण पाठिंबा दिला आणि तिच्यासाठी ते कोच्चीहून आधी चेन्नई आणि मग मुंबईला शिफ्ट झाले.

असिनने नेवल पब्लिक स्कूलमधून १० वी पर्यंतचं शिक्षण घेतलं. यानंतर तिने इंग्लिश लिटरेचरमध्ये ग्रॅज्युएशन केलं. यानंतर तिने 2001 साली मल्याळम सिनेमातून अभिनयात पदार्पण केलं. तेव्हा ती केवळ 15 वर्षांची होती.

असिनने साऊथमध्ये रवितेजा आणि नागार्जुनसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आमिर खानसोबत तिने 'गजनी'मध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली.

नंतर तिने सलमान खानसोबत 'रेडी',अक्षय कुमारसोबत 'हाऊसफुल 2' सिनेमात काम केले. याच सिनेमावेळी अक्षय कुमारने तिची उद्योगपती राहुल शर्माशी ओळख करुन दिली. या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि नंतर दोघंही लग्नबंधनात अडकले.

राहुल शर्मा हे 1300 कोटी संपत्तीचे मालक आहेत. असिन आणि अक्षय कुमार सिनेमाच्या शूटवेळी ज्या प्रायव्हेट जेटने गेले ते जेट राहुल शर्मा यांचेच होते.असिनला राहुल यांचा साधेपणा खूप आवडला होता.

2016 साली राहुल शर्मा यांच्याशी लग्न केल्यानंतर असिनने फिल्मइंडस्ट्रीला कायमचा रामराम केला. तिने 2015 साली 'ऑल इज वेल' सिनेमात शेवटचं काम केलं होतं. तर 2017 मध्ये तिने मुलीला जन्म दिला.

लेकीचं नाव तिने अरिन असं ठेवलं असून तिला आडनाव दिलेलं नाही. धर्म, जात, लिंग या सर्व बंधनातून त्यांनी अरिनला स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय घेतला. सध्या असिन घर संसारात रमली आहे.

मध्यंतरी असिन आणि राहुल शर्मा यांच्या घटस्फोटाच्या अफवा आल्या होत्या. तेव्हा असिनने या अफवांचं खंडन केलं होतं. ती आपल्या कुटुंबासोबत मुंबईतच वास्तव्यास आहे.