विकीची आई लाडक्या सुनेला लाडाने 'या' नावाने हाक मारतात, कतरिना कैफने केला खास खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 16:31 IST2024-10-23T16:14:35+5:302024-10-23T16:31:54+5:30

कतरिना कैफने विकीची आई तिला कोणत्या नावाने प्रेमाने हाक मारते, याचा खुलासा केलाय (katrina kaif, vicky kaushal)

कतरिना कैफ आता कौशल कुटुंबाची सून आहे. विकी आणि कतरिना या दोघांनी ९ डिसेंबर २०२१ ला एकमेकांशी लग्नगाठ बांधली

विकी-कतरिना हे अनेक महिने एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर दोघांनी अचानक लग्न करुन त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला

विकी-कतरिना सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे अनेक फोटो पोस्ट करत असतात. दोघांच्या फोटोंना त्यांच्या चाहत्यांकडून लाईक्स-कमेंट्सचा वर्षाव होत असतो

कतरिनाने काही दिवसांपूर्वी कपिल शर्मा शोमध्ये तिच्या सासूबाई म्हणजेच विकीची आई तिला कोणत्या नावाने हाक मारतात याचा खुलासा केला होता

विकीची आई कतरिनाला 'किट्टो' या अस्सल पंजाबी स्टाईल नावाने हाक मारतात. विकीचे आई-बाबा लाडक्या सुनेची खूप काळजी घेतात

सुरुवातीला विकीची आई कतरिनाला प्रेमाने पराठे वगैरे खायला द्यायची. पण कतरिना फिटनेसवर लक्ष देऊन पराठ्यांचा एखादाच घास खायची

पण नंतर जसं विकीच्या आईला कळलं तेव्हापासून त्या लाडक्या सुनेच्या डाएटची पूर्ण काळजी घेतात. त्यामुळे कतरिना सुद्धा सासूबाईंच्या प्रेमळ स्वभावाचा वारंवार उल्लेख करते