आमिर खानच्या विहीणबाई आहेत सुश्मिता सेनच्या 'गुरु माँ', वाचा काय आहे नेमकं कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 12:15 PM2024-01-08T12:15:39+5:302024-01-08T12:42:53+5:30

आयरा खानच्या सासूबाई प्रितम शिखरे सध्या सोशल मीडियावर सर्वांच्या फेवरेट बनल्या आहेत. त्यांच्या गोड हास्याने सर्वांचं लक्ष वेधलंय.

आमिर खानची लेक आयरा खान (Ira Khan) नुकतीच लग्नबंधनात अडकली. बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) तिने रजिस्टर मॅरेज केलं. नुपूर हा फिटनेस ट्रेनर असून त्याने आमिर खानला प्रशिक्षण दिलं आहे. त्याचदरम्यान आयरा आणि नुपूरची ओळख झाली आणि दोघं प्रेमात पडले.

नुकतंच आयरा आणि नुपूरचं कुटुंब उदयपूरला पोहोचलं. तिथे ग्रँड पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. आमिर खान, त्याच्या दोन्ही एक्स वाईफ रिना दत्ता आणि किरण रावही उदयपूरला पोहोचले आहेत.

तर आयराच्या सासूनेही सगळ्यांचं लक्ष वेधलंय. अगदी गोड स्वभावाच्या असणाऱ्या प्रितम शिखरे (Pritam Shikhare) या आयराच्या सासूबाई आहेत. नुपूर त्यांचा लाडका लेक आहे. लेकाच्या लग्नात प्रितम शिखरे अगदी उत्साहात दिसत आहेत. आमिर खान आणि त्याच्या दोन्ही एक्स वाईफबरोबरचे त्यांचे फोटो व्हायरल झालेत.

प्रितम शिखरे यांचंही मनोरंजनसृष्टीशी कनेक्शन आहे. त्या लोकप्रिय कथ्थक नृत्यांगना आहेत. त्यांनी अनेकांना कथ्थकचे धडे दिले आहेत. त्यांचं युट्यूबन चॅनलही आहे जिथे त्या आपलं डान्स टॅलेंट शेअर करतात.

तर कथ्थकमुळेच प्रितम शिखरे आणि सुश्मिता सेन (Sushmita Sen) यांच्यात ओळख आहे. प्रितम यांनी सुश्मिताला कथ्थकचे धडे दिले आहेत. ती त्यांना 'गुरु माँ' म्हणून संबोधते. सुश्मितासाठी त्या गुरुस्थानी आहेत.

सुश्मिताने प्रितम शिखरे यांच्या वाढदिवसाला त्यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केली होती.यामध्ये सुश्मिताने त्यांची खूप स्तुती केली होती. इतकंच नाही तर सुश्मिताची लेक रेने हिलाही प्रितम शिखरे यांनी कथ्थकचं ट्रेनिंग दिलं आहे.

आपल्या लेकाच्या साखरपुड्याला प्रितम शिखरे लेकासोबत मनसोक्त नाचल्या. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

आयरा आणि नुपूर शिखरे आज उदयपूर येथे लग्नबंधनात अडकत आहेत. यासाठी काही बॉलिवूड कलाकार हजेरी लावणार आहेत. शिवाय नंतर मुंबईत रिसेप्शनही पार पडणार आहे.