बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी 'या' 7 अभिनेत्रींनी बदलली त्यांची नावं; जाणून घ्या कियारा, शिल्पाचं खरं नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 01:08 PM2022-01-13T13:08:54+5:302022-01-13T13:15:58+5:30

Bollywood Actress: कलाविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी आपलं मूळ नाव बदललं आहेत.

कलाविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी आपलं मूळ नाव बदललं आहेत. त्यामुळेच सध्याच्या घडीला लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या कोणत्या सेलिब्रिटींनी त्यांची नावं बदलली आहेत. आणि, त्यांचं खरं नाव काय ते पाहुयात.

मिरना - दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मिरना हिचं खरं नाव अदिती मेनन असं आहे.

कियारा अडवाणी- ‘कबीर सिंग’ चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या कियाराचं खरं नाव आलिया अडवाणी आहे.

अनुष्का शेट्टी- बाहुबली फेम अनुष्का शेट्टीने कलाविश्वात येण्यापूर्वी तिचं नाव बदललं. अनुष्काचं खरं नाव स्वीटी शेट्टी असं आहे.

अनिता हसनंदानी- ये हैं महोब्बते या मालिकेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेल्या अनिताचं खरं नाव नताशा असं आहे. परंतु, तिनेही तिचं नाव बदलून कलाविश्वात प्रवेश केला आहे. अनिताने अनेक तामिळ, तेलुगू, कन्नड आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच काव्यांजली, नागीन या मालिकांमधील तिच्या भूमिकाही गाजल्या आहेत.

शिल्पा शेट्टी - बॉलिवूडची फिटनेस गर्ल शिल्पा शेट्टी हे नाव आज सर्वपरिचित आहे. परंतु, शिल्पाचं खरं नाव हे नाही. शिल्पाचं खरं नाव अश्विनी आहे. शिल्पाची आई ज्योतिषशास्त्र विशेषज्ञ असल्यामुळे त्यांनी शिल्पाला तिचं खरं नाव बदलायला सांगितलं.

राखी सावंत- आपल्या अतरंगी स्टाइल आणि वायफळ वक्तव्यांमुळे कायम चर्चेत येणाऱ्या राखी सावंतचं खरं नाव नीरू भेडा आहे.

अनाका पॉल- अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकलेल्या अनाका पॉलचं खरं नाव अमला पॉल आहे.