फेब्रुवारीमध्ये प्रेक्षकांना मिळणार सिनेमांची मेजवानी, रिलीज होणार 'हे' खास चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 03:12 PM2024-02-04T15:12:28+5:302024-02-04T15:49:27+5:30

फेब्रुवारीमध्ये रिलीज होणाऱ्या बिग बजेट चित्रपटांच्या यादीवर एक नजर...

अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि अभिनेत्री क्रिती सॅनन (Kriti Sanon) यांच्या 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हा चित्रपट 9 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये क्रिती ही रोबोटच्या भूमिकेत असणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमच्या 'आर्टिकल 370' या चित्रपटाचं टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझरमध्ये यामी गौतम एका अधिकाऱ्याच्या भूमिकेत असून दहशतवाद्यांशी लढताना दिसत आहे. हा सिनेमा आर्टिलक 370 (Article 370) म्हणजेच जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा हटवण्याच्या कथेवर आधारित आहे.

या सिनेमात प्रसिद्ध मराठी अभिनेता वैभव तत्ववादीनं लक्षवेधी भूमिका साकारली आहे. हा सिनेमा 23 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक आदित्य सुहास जांभळे दिग्दर्शित या सिनेमाने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.

विद्युत जामवालचा 'क्रॅक' सिनेमा 23 फेब्रुवारीला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. विद्युत जामवाल, अब्बास सय्यद आणि प्रांजल खंडाडिया यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विद्युत जामवाल या चित्रपटाचा सहनिर्माता देखील आहे.

गुरु रंधावाचा 'कुछ खट्टा हो जाए' हा चित्रपट 16 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. या चित्रपटात गुरू रंधावाशिवाय अनुपम खेर, सई मांजरेकर, इला अरुण यांसारखे दिग्गज कलाकारही भूमिका साकारणार आहेत.

'लव्ह सेक्स और धोखा' हा चित्रपट 16 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' हा चित्रपट 16 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' या आगामी एअरफोर्सशी निगडित सिनेमात मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर रडार ऑफिसरची लक्षवेधी महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

'भक्षक'हा एका सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. हा चित्रपट 'नेटफ्लिक्स' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ९ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांचा 'लाल सलाम' हा सिनेमाही ९ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. यामध्ये रजनीकांत यांचा कॅमिओ आहे. लाल सलाम हे रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिने दिग्दर्शित केले आहे, ज्यात विष्णू विशाल आणि विक्रांत मुख्य भूमिकेत आहेत.