निळ्या डेनिम ड्रेसमध्ये तमन्ना भाटियाचा ग्लॅमरस लूक; हटके पोज देत क्लिक केले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 16:43 IST2024-12-05T16:31:54+5:302024-12-05T16:43:40+5:30
अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या नव्या फोटोशूटची होतेय चर्चा, नेटकरी म्हणाले...

अभिनेत्री तमन्ना भाटिया अलिकडेच 'सिकंदर का मुक्कदर' या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली होती.
बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्री गाजवणाऱ्या तमन्नाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
अभिनेत्रीने तिच्या आजवरच्या फिल्मी कारकिर्दीत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलंय.
'स्त्री २' या चित्रपटामधील 'आज की रात' या गाण्यामुळे तिच्याविषयी मनोरंजनविश्वात चर्चा रंगली होती.
तसेच 'बाहुबली' सिनेमातील तिने साकारलेली भूमिकाही चाहत्यांच्या स्मरणात आहे.
अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या फॅशनसेन्समुळे कायमच चर्चेत येत असते.
तिचं हटके फोटोशूट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं.
दरम्यान, नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले आहेत.
निळ्या रंगाचा डेनिम ड्रेस तसेच त्यावर साजेसा खड्यांचा नेकलेस असा सुंदर लूक तिने केला आहे.