Bigg bossफेम शिवानी सुर्वे करतीये 'या' मराठमोळ्या अभिनेत्याला डेट; तुम्हाला माहितीये का त्याच्याविषयी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 13:50 IST2022-02-15T13:47:00+5:302022-02-15T13:50:12+5:30
Shivani surve: शिवानीविषयी,तिच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. यात खासकरुन तिच्या प्रियकराविषयी जाणून घेण्याची नेटकऱ्यांची उत्सुकता असते.

'देवयानी', 'बिग बॉस मराठी' अशा गाजलेल्या मालिका, कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी सुर्वे.
उत्तम अभिनयासोबतच आपल्या सौंदर्यामुळेही शिवानीने कलाविश्वात तिचा स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला आहे.
शिवानीविषयी,तिच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. यात खासकरुन तिच्या प्रियकराविषयी जाणून घेण्याची नेटकऱ्यांची उत्सुकता असते.
बिग बॉस मराठीच्या घरात प्रचंड राडे करणाऱ्या शिवानीने याच घराक किशोरी शहाणेसमोर तिच्या प्रेमाची कबुली दिली होती.
किशोरी शहाणे यांच्यासोबत बोलत असताना शिवानीने तिच्या प्रियकराचं नाव आणि त्यांची लव्हस्टोरी कशी सुरु झाली हे सांगितलं होतं. तेव्हापासून तिच्या बॉयफ्रेंडला पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते.
शिवानी सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर करत असते.
शिवानीच्या प्रियकराचं नाव अजिंक्य ननावरे असून तोदेखील मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे.
अजिंक्यने अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.
'तू जीवाला गुंतवावे' या मालिकेत अजिंक्य आणि शिवानी यांनी एकत्र काम केले होते. याच मालिकेदरम्यान त्या दोघांची चांगली मैत्री झाली आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होत त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली.
'असावा सुंदर स्वप्नांचा बंगला', 'सख्या रे', 'गर्ल्स हॉस्टेल' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे.