Cannes Film Festival 2022: ‘कान्स’मध्ये अवतरले ‘ऐश्वर्य’,पाहा ऐश्वर्या रायचा रेड कार्पेट लुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 11:34 AM2022-05-19T11:34:23+5:302022-05-19T11:42:23+5:30

Aishwarya Rai Bachchan at Cannes Film Festival 2022: ऐश्वर्या रेड कार्पेटवर आली अन् तिने सर्वांना जिंकलं. तिच्यासमोर इतर अभिनेत्रीही फिक्या पडल्या...

चाहत्यांना प्रतीक्षा होती, तो क्षण अखेर आला आहे. होय, ऐश्वर्या रायचा कान्स सोहळ्यातील रेड कार्पेट लुक कधी एकदा समोर येतो, असं चाहत्यांना झालं होतं. अखेर प्रतीक्षा संपली आहे.

75 व्या कान्स चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या चित्रपट महोत्सवाची चर्चा आता सगळीकडेच रंगतेय आणि आता या सोहळ्याच्या रेड कार्पेटवरील ऐश्वर्याचा लुक समोर आला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचा मानल्या जाणाऱ्या कान्स चित्रपट महोत्सवात कलाविश्वातील अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावतात. ऐश्वर्या पती अभिषेक व मुलगी आराध्यासोबत या सोहळ्यासाठी रवाना झाली होती.

ऐश्वर्या कान्समध्ये सहभागी होणार म्हटल्यावर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर काल कान्स सोहळ्याच्या दुसºया दिवशी ऐश रेड कार्पेटवर उतरली.

ब्लॅक कलरचा फ्लोरल व रफल गाऊनमध्ये तिने रेड कार्पेटवर धमाकेदार एन्ट्री घेतली. या गाऊनमध्ये ऐश्वर्या कमालीची सुंदर दिसत होती.

ऐश्वर्या रेड कार्पेटवर येताच, सगळे कॅमेरे तिच्यावर खिळले. ऐश्वर्याचा लुक पाहून सगळेच तिच्या प्रेमात पडले. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सौंदर्याच्या बाबतीत जगभरातील अभिनेत्रींना मागे टाकणाऱ्या ऐश्वर्याची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येक जण आतुर असतो. कान्सच्या रेड कार्पेटवरचं चित्र यापेक्षा वेगळं नव्हतं.

ऐश्वर्या रेड कार्पेटवर आली अन् तिने सर्वांना जिंकलं. तिच्यासमोर इतर अभिनेत्रीही फिक्या पडल्या. फ्लोरल ब्लॅक गाऊन, मोकळे केस आणि कानात डायमंड इअररिंग्स असा तिचा लुक होता.

ऐश्वर्याने 2002 मध्ये पहिल्यांदाच कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली होती. हे कान्स सोहळ्याला हजेरी लावण्याचं तिचं विसावं वर्ष आहे.

सर्वप्रथम ‘देवदास’ या चित्रपटाच्या निमित्ताने ती कान्समध्ये दिसली होती. या चित्रपटाचं स्क्रिनिंग कान्समध्ये करण्यात आलं होतं. सलग वीस वर्ष ऐश्वर्या कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावत आहे.

2002 मध्ये ऐश्वर्याने पहिल्यांदा कान्समध्ये हजेरी लावली तेव्हा तिच्यासोबत शाहरूख खान, संजय लीला भन्साळी होते. देवदासच्या या टीमला 10 मिनिटं स्टँडिंग ओवशन मिळालं होतं.

यावेळी कान्स सोहळ्यात ऐश्वर्याशिवाय दीपिका पादुकोण, तमन्ना भाटिया, उर्वशी रौतेला, आर. माधवन, नवाजुद्दीन सिद्दीकी, हिना खान, हेली शाह, ए. आर रहमान असे सगळे स्टार्स सामील झाले आहेत.