जून महिन्यात मनोरंजनाचा धमाका, 'हे' जबरदस्त चित्रपट ओटीटीवर होणार प्रदर्शित, कुठे पाहाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 19:17 IST2025-05-26T19:16:57+5:302025-05-26T19:17:06+5:30

अनेक बहुप्रतिक्षित चित्रपट हे जून महिन्यात OTT प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम केले जाणार आहेत.

Ott Releases June 2025 Kesari Chapter 2 Ground Zero Stolen And Jaat Hindi Films To Stream Prime Video Netflix Jiohotstar | जून महिन्यात मनोरंजनाचा धमाका, 'हे' जबरदस्त चित्रपट ओटीटीवर होणार प्रदर्शित, कुठे पाहाल?

जून महिन्यात मनोरंजनाचा धमाका, 'हे' जबरदस्त चित्रपट ओटीटीवर होणार प्रदर्शित, कुठे पाहाल?

Ott Releases June 2025: जर तुम्हाला मनोरंजनाची आवड असेल तर जून २०२५ हा महिना तुमच्यासाठी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट घेऊन येत आहे. एकीकडे थिएटरमध्ये अक्षय कुमारचा मल्टीस्टारर 'हाऊसफुल ५', आमिर खानचा 'सितारे जमीन पर' आणि काजोलचा 'मां' हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तर दुसरीकडे ओटीटीवरही चार उत्तम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यापैकी तीन चित्रपटांनी आधीच थिएटरमध्ये गाजवलं आहे. तर एक चित्रपट हा थेट ओटीटीवर येतोय.

स्टोलन : अभिषेक बॅनर्जी आणि हरीश खन्ना स्टारर क्राइम-थ्रिलर 'स्टोलन' (Stolen) हा चित्रपट ४ जून रोजी अमेझॉन प्राइम व्हिडीओवर (Prime Video) प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार मिळाले आहेत. ही करण तेजपाल दिग्दर्शित पहिलीच फीचर फिल्म असून ती जंगल बुक स्टुडिओसाठी गौरव ढींगरा यांनी निर्मित केली आहे. 'स्टोलन'ची कहाणी करण तेजपाल यांनी स्वप्निल सालकार - अगडबम आणि गौरव ढींगरा यांच्यासोबत लिहिली आहे. 


जाट: सनी देओल आणि रणदीप हुड्डा यांचा 'जाट' (Jaat) हा चित्रपट एप्रिल महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. १०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त ८८.६१ कोटी रुपयांची कमाई केली. हा चित्रपट येत्या ६ जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित होत आहे.


केसरी चॅप्टर २: अक्षय कुमारच्या 'केसरी चॅप्टर २' (Kesari Chapter 2) चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. आता हा चित्रपट १३ जून रोजी ओटीटीवरही प्रदर्शित होत आहे. तुम्ही तो जिओहॉटस्टारवर (JioHotstar) पाहू शकाल. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर ब्रिटिश सरकारला न्यायालयात खेचणारे वकील सी. शंकरन नायर यांची ही कहाणी आहे.


ग्राउंड झिरो: तेजस प्रभा विजय देओस्कर दिग्दर्शित 'ग्राउंड झिरो' (Ground Zero) हा  चित्रपट २५ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात इमरान हाश्मी आणि मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हे मुख्य भुमिकेत होते. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. 'ग्राउंड झिरो' येत्या २७ जून रोजी अमेझॉन प्राइम व्हिडीओवर (Prime Video) प्रदर्शित होईल. हा एक सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. 

Web Title: Ott Releases June 2025 Kesari Chapter 2 Ground Zero Stolen And Jaat Hindi Films To Stream Prime Video Netflix Jiohotstar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.