'मुरांबा' फेम अभिनेत्रीने खरेदी केली नवी कोरी आलिशान कार, पोस्ट शेअर करत म्हणाली, "आम्ही कलाकार..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 11:48 AM2023-10-25T11:48:59+5:302023-10-25T11:49:53+5:30

दसऱ्याच्या मुहुर्तावर मराठी अभिनेत्रीने नवी कार खरेदी केली आहे. याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

muramba fame marathi actress smita shewale buys new kia luxury car shared video | 'मुरांबा' फेम अभिनेत्रीने खरेदी केली नवी कोरी आलिशान कार, पोस्ट शेअर करत म्हणाली, "आम्ही कलाकार..."

'मुरांबा' फेम अभिनेत्रीने खरेदी केली नवी कोरी आलिशान कार, पोस्ट शेअर करत म्हणाली, "आम्ही कलाकार..."

अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमधून काम करून अभिनयाचा ठसा उमटवलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे स्मिता शेवाळे. २००६ साली प्रदर्शित झालेल्या 'यंदा कर्तव्य आहे' या चित्रपटातून स्मिता प्रसिद्धीझोतात आली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. त्यानंतर अनेक सुपरहिट चित्रपटांत स्मिता दिसली. स्मिता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळते. नुकतंच स्मिताने एक गुडन्यूज शेअर केली आहे. 

स्मिताने दसऱ्याच्या मुहुर्तावर नवी कोरी आलिशान कार खरेदी केली आहे. स्मिताने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन कारचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिने नवी कोरी किया कंपनीची गाडी खरेदी केली आहे. "ही कार मी @dhonekia इथून घेतली.  अभिजीत यांनी खूप छान सर्विस दिली. आम्ही कलाकार शूटिंगमध्ये व्यस्त असतो हे जाणून त्यांनी अगदी त्याप्रमाणे कार प्रोसेसची सगळी काम व्यवस्थित पार पाडली. कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येऊ दिला नाही. अतिशय आदरपूर्वक आणि संयमानं माझ्या सगळ्या संस्थेचं निरसन केलं त्यासाठी त्यांचे मनापासून आभार," असं स्मिताने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनी स्मिताचं अभिनंदन केलं आहे. 

सध्या स्मिता स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुरांबा' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'सुभेदार' चित्रपटात ती ऐतिहासिक भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात तिने तान्हाजी मालुसरेंच्या पत्नीची भूमिका साकारली होती. 

Web Title: muramba fame marathi actress smita shewale buys new kia luxury car shared video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.