एक शहर, दो दिल और...! मृणाल-सिद्धांतची जमली जोडी; 'दो दीवाने सहर में'चा टीझर रिलीज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 16:47 IST2026-01-19T16:46:40+5:302026-01-19T16:47:59+5:30

Do Deewane Seher Mein Teaser: बॉलिवूडच्या 'या' हॅण्डसम हंकसोबत मृणाल ठाकूर करणार रोमान्स, 'या' दिवशी चित्रपट होणार रिलीज

mrunal thakur and siddhant chaturvedi starrer do deewane seher mein teaser out know about release date | एक शहर, दो दिल और...! मृणाल-सिद्धांतची जमली जोडी; 'दो दीवाने सहर में'चा टीझर रिलीज 

एक शहर, दो दिल और...! मृणाल-सिद्धांतची जमली जोडी; 'दो दीवाने सहर में'चा टीझर रिलीज 

Do Deewane Seher Mein Teaser: बॉलिवूडसह दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्री गाजवणारी अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर. आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या नायिकेने आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मृणाल ठाकूर तिच्या चित्रपटांसह वैयक्तिक आयुष्यामुळेही तितकीच चर्चेत असते. लवकरच मृणाल बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या 'दो दीवाने  एक शहर में' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे सिनेरसिकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. 


'दो दीवाने सहर में' हा एक रोमॅन्टिक चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रवी उदयवार यांनी केलं असून संजय लीळा भन्सांळींची निर्मिती आहे. या चित्रपटातून सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर ही नवी जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे. 

नुकताच सोशल मीडियावर  'दो दीवाने सहर में' या चित्रपटाचा टीझर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय,'क्योंकि हर 'इश्क' परफेक्ट नहीं होता, पर काफी होता है. चित्रपटाच्या एक मिनिट आणि चार सेकंदांच्या टीझरमध्ये प्रेमकथा दाखवण्यात आली आहे, जी प्रेक्षकांना कथेतील प्रेम, भावनेशी जोडून ठेवणारी आहे.टीझरमधील मृणाल-सिद्धांतची केमिस्ट्री लक्ष वेधून घेत आहे. शिवाय त्यांच्यातील प्रेम,लूक आणि बॅकग्राउंड म्युझिक सुद्धा चर्चेत आहे.  सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर केमिस्ट्री टीझरमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. 

मृणाल यामध्ये रोशनी नावाची भूमिका साकारते तर सिद्धांत शशांक ही व्यक्तिरेखा साकारतो आहे. 'दो दीवाने सहर में'  हा चित्रपट २० फेब्रुवारी म्हणजेच व्हेलेंटाईन डेच्या दिवशी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

Web Title : 'दो दीवाने शहर में' टीज़र में मृणाल-सिद्धांत की केमिस्ट्री!

Web Summary : संजय लीला भंसाली की 'दो दीवाने शहर में' में मृणाल ठाकुर और सिद्धांत चतुर्वेदी की जोड़ी बनी है। टीज़र में उनकी केमिस्ट्री दिखती है। मृणाल रोशनी और सिद्धांत शशांक की भूमिका में हैं। फिल्म वैलेंटाइन डे पर रिलीज होगी।

Web Title : Mrunal-Siddhant's chemistry shines in 'Do Deewane Seher Mein' teaser!

Web Summary : Mrunal Thakur and Siddhant Chaturvedi pair up in Sanjay Leela Bhansali's 'Do Deewane Seher Mein'. The teaser reveals a romantic tale, showcasing their captivating chemistry. Mrunal plays Roshni, and Siddhant is Shashank. The film releases on Valentine's Day.