Video: सिंबामुळे अप्पी-अर्जुन पुन्हा येणार एकत्र?; चिमुकल्यामुळे येणार मालिकेत ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 05:50 PM2024-05-26T17:50:00+5:302024-05-26T17:50:00+5:30

Appi Amchi Collector: अर्जुन आणि आर्या यांचा साखरपुडा होत असतांनाच तिथे सिंबाची एन्ट्री होते आणि सगळं सगळं गणित बदलतं

marathi tv serial Appi Amchi Collector Will Appi-Arjun get back together because of Simmba | Video: सिंबामुळे अप्पी-अर्जुन पुन्हा येणार एकत्र?; चिमुकल्यामुळे येणार मालिकेत ट्विस्ट

Video: सिंबामुळे अप्पी-अर्जुन पुन्हा येणार एकत्र?; चिमुकल्यामुळे येणार मालिकेत ट्विस्ट

'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका सध्याच्या घडीला लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. उत्तम कथानक आणि त्याला मिळालेली कलाकारांच्या अभिनयाची साथ यांच्या जोरावर ती अल्पावधीत लोकप्रिय झाली. अर्जुन आणि अप्पी यांच्या संसारात अनेक चढउतार आल्यानंतर आता या दोघांनीही त्यांच्या स्वतंत्र वेगळ्या वाटा निवडायचा निर्णय घेतला आहे. मात्र, सिंबाला अर्जुनच त्याचा बाबा असल्याचं सत्य समजलं आहे. त्यामुळे तो आई-बाबांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे. 

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अर्जुन आणि आर्या यांचा साखरपुडा होतांना दिसत आहे. त्याच वेळी सिंबा तिथे येतो आणि लवकरच अर्जुन-अप्पीला एकत्र आणणार असल्याचं म्हणतो. या प्रोमोवरुन पुन्हा एकदा मालिकेत ट्विस्ट येणार असल्याचं दिसून येतं.

अपर्णा सिंबाला घेऊन पुण्यात आल्यानंतर बऱ्याचदा सिंबा आणि अर्जुनची भेट झाली. समर कॅम्पमध्येही ही बापलेकाची जोडी दररोज भेटत होती. परंतु, दोघांनाही त्यांचं नात माहित नव्हतं. यात सिंबा, अर्जुनच त्याचा बाबा आहे हे शोधून काढतो आणि पुन्हा एकदा अप्पी-अर्जुनला एकत्र आणायचं ठरवतो. 

दरम्यान, ज्या दिवशी अर्जुन-आर्याचा साखरपुडा असतो त्याच दिवशी सिंबा अर्जुनला भेटतो आणि मिठी मारतो. सोबतच काहीही झालं तर मा आणि तुम्हाला एकत्र आणणार असा निश्चयही करतो. त्यामुळे आता सिंबामुळे अर्जुन-अप्पी एकत्र येणार का? सिंबाला त्याच्या आई-वडिलांचं प्रेम मिळणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावर मिळणार आहेत.

Web Title: marathi tv serial Appi Amchi Collector Will Appi-Arjun get back together because of Simmba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.