'अप्पी आमची कलेक्टर' फेम आर्याला ओळखलं का? यापूर्वी केलंय 'बाळू मामाच्या नावानं चांगभलं' मध्ये काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 02:54 PM2024-05-07T14:54:39+5:302024-05-07T14:57:55+5:30

Appi Amchi Collector: सध्या नेटकऱ्यांमध्ये आर्याची चर्चा होतीये. आर्याचा डॅशिंग अंदाज प्रेक्षकांना बराच भावला आहे.

छोट्या पडद्यावर अप्पी आमची कलेक्टर ही मालिका सध्या बरीच गाजत आहे. या मालिकेत जवळपास ७ वर्षांचा लीप घेण्यात आला आहे.

या मालिकेत अनेक नवनवीन कलाकारांची एन्ट्री झाली आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे आर्या.

अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत अर्जुनची सहकारी म्हणून आर्या या नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे.

सध्या नेटकऱ्यांमध्ये आर्याची चर्चा होतीये. आर्याचा डॅशिंग अंदाज प्रेक्षकांना बराच भावला आहे.

आर्याची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत अभिनेत्री श्रद्धा मांगले ही आर्याची भूमिका साकारत आहे.

श्रद्धाने या मालिकेपूर्वी अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.

बाळू मामाच्या नावाने चांगभलं या मालिकेतही ती झळकली आहे. या मालिकेत तिने कुसुम ही भूमिका साकारली होती.