​अक्षर कोठारीने काय रे रास्कला या चित्रपटाच्या टीमला सुचवली लोकेशन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2017 12:38 PM2017-03-07T12:38:56+5:302017-03-07T18:08:56+5:30

अक्षर कोठारी सध्या चांगलाच खूश आहे. कारण तो चाहूल या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे . तसेच त्याचे एक ...

Written Locations by Akshar Kothari to the team of Ray Rascala | ​अक्षर कोठारीने काय रे रास्कला या चित्रपटाच्या टीमला सुचवली लोकेशन्स

​अक्षर कोठारीने काय रे रास्कला या चित्रपटाच्या टीमला सुचवली लोकेशन्स

googlenewsNext
्षर कोठारी सध्या चांगलाच खूश आहे. कारण तो चाहूल या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. तसेच त्याचे एक नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे आणि त्याचसोबत काय रे रास्कला या चित्रपटात तो एक महत्त्वाची भूमिका साकारत आहे. व्हेंटिलेटर या चित्रपटाची निर्मिती प्रियांका चोप्राने केली होती. या चित्रपटाच्या यशानंतर प्रियांका काय रे रास्कला हा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटात काम करण्याची संधी अक्षरला मिळाली आहे.
प्रियांका चोप्रा निर्माती असलेल्या चित्रपटात काम करायला मिळत असल्याने अक्षर सध्या खूप खूश आहे. पण त्याचसोबत आणखी एका कारणामुळे तो आनंदित आहे. त्याच्या काय रे रास्कला या चित्रपटाचे अधिकाधिक चित्रीकरण हे सोलापुरात झाले आहे आणि अक्षर हा मुळचा सोलापुरचा असल्याने आपल्या शहरात चित्रपटाचे चित्रीकरण झाल्याचा त्याला खूपच आनंद झाला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सोलापुरात होत आहे हे कळल्यावर अक्षरने स्वतः चित्रपटाच्या टीमला फोन केला होता आणि काहीही मदत असल्यास मला सांगा असे त्यांना सांगितले होते. या चित्रपटातील काही लोकेशन्सदेखील अक्षरने टीमला सुचवली आहेत. याविषयी अक्षर सांगतो, "काय रे रास्कला या चित्रपटाचे चित्रीकरण सोलापुरात झाले असल्याने मी ते अधिक एन्जॉय केले. माझ्या शहरात चित्रीकरण असल्याने माझ्या कुटुंबालादेखील सेटवर येता आले होते. त्याचा मला अधिक आनंद झाला. मला सोलापूर हे शहर खूप चांगल्याप्रकारे माहीत असल्याने मी या चित्रपटाच्या टीमला लोकेशन्सदेखील सुचवले होते. माझ्या एका शालेय मित्राचे खूप छान फार्म हाऊस आहे. ते फार्म हाऊस मी त्यांना दाखवले होते. ते त्यांना अतिशय आवडले आणि त्यांनी या फार्म हाऊसवर काही दृश्यांचे आणि एका गाण्याचे चित्रीकरणदेखील केले." 

Web Title: Written Locations by Akshar Kothari to the team of Ray Rascala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.