Ved Movie : सत्या श्रावणीच्या प्रेमाची जादू नव्या रुपात, रितेशने शेअर केली 'वेड तुझे'च्या नव्या व्हर्जनची झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 07:52 PM2023-01-18T19:52:10+5:302023-01-18T19:56:44+5:30

Ved Marathi Movie : वेड तुझे या गाण्याचं नवीन व्हर्जन आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि त्याची झलक रितेशने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Ved Movie: Satya Shravani's magic of love in a new form, Ritesh shares a glimpse of the new version of 'Ved Tujhe' | Ved Movie : सत्या श्रावणीच्या प्रेमाची जादू नव्या रुपात, रितेशने शेअर केली 'वेड तुझे'च्या नव्या व्हर्जनची झलक

Ved Movie : सत्या श्रावणीच्या प्रेमाची जादू नव्या रुपात, रितेशने शेअर केली 'वेड तुझे'च्या नव्या व्हर्जनची झलक

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील 'वेड' (Ved Marathi Movie) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया डिसूझा (Genelia D'souza Deshmukh) स्टारर चित्रपट ३० डिसेंबर रोजी रुपेरी पडद्यावर आला आणि चित्रपटानं आता ५० कोटींकडे घोडदौड सुरु केली आहे. या चित्रपटाला मिळणारं प्रेम पाहून वेड चित्रपटाच्या टीमनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि मनोरंजन सृष्टीत ही गोष्ट पहिल्यांदाच रितेश-जिनीलियाच्या 'वेड' चित्रपटामुळे घडून येणार आहे. वेड तुझे या गाण्याचं नवीन व्हर्जन आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि त्याची झलक रितेशने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर याआधी कधीच कुणी एखादं गाणं चित्रपटात सामिल केलं नव्हतं. मराठी इंडस्ट्रीतच काय तर अगदी बॉलीवूड,टॉलीवूडमध्ये देखील हे घडलं नव्हतं.  पण 'वेड' चित्रपटात आता सत्या(रितेश देशमुख) आणि श्रावणी(जिनीलिया देशमुख) यांच्यावर चित्रित केलेलं 'वेड तुझे..' या गाण्याचं नवं व्हर्जन सामिल करण्यात येणार आहे आणि सोबत काही नवे सीन्सही चित्रित करून सामिल करण्यात आले आहेत.  येत्या शुक्रवारी म्हणजे २० जानेवारी,२०२३ पासून चित्रपटगृहात 'वेड' पाहताना आता या नव्या गाण्याचा आनंदही प्रेक्षक लुटू शकणार आहेत. 


या नव्या गाण्याची झलक शेअर करत रितेश देशमुखने लिहिले की, अनुभवा सत्या आणि श्रावणी च्या प्रेमाची जादू नव्या रुपात.
रितेश-जिनीलिया हे जोडपं केवळ ऑन स्क्रीन नाही तर ऑफ स्क्रीनही चाहत्यांचं फेव्हरेट आहे. त्यामुळे नेहमीच त्यांना एकत्र पाहणं सगळ्यांना आवडतं. 

'वेड' चित्रपटाच्या माध्यमातून अनेक वर्षांनी दोघे मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले आणि पुन्हा एकदा प्रेक्षक यांच्या केमिस्ट्रीच्या प्रेमात पडले. रितेशनं साकारलेला 'सत्या' आणि जिनीलियानं साकारलेली 'श्रावणी' सर्वांनाच आपलं वेड लावून गेली. त्यामुळे आता दोघांवर नव्यानं चित्रित केलेलं  वेड तुझे हे गाणं देखील सर्वांची वाहवा मिळवून जाणार यात शंका नाही. चित्रपटात आधी 'वेड तुझे..' हे गाणं रितेश देशमुख आणि जिया शंकर यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. त्या गाण्यानेही प्रेक्षकांवर जादू केली. त्यामुळे आता रितेश-जिनीलियाच्या 'वेड तुझे..' या गाण्याच्या नव्या व्हर्जनला देखील  रसिक चाहते उचलून धरतील अशी आशा आहे. 

Web Title: Ved Movie: Satya Shravani's magic of love in a new form, Ritesh shares a glimpse of the new version of 'Ved Tujhe'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.