2016 या वर्षातील मराठी चित्रपटातील या गाण्यांनी रसिकांना सैराटमय केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2016 15:27 IST2016-12-27T10:51:22+5:302016-12-27T15:27:12+5:30

2016 या वर्षात सैराट चित्रपटातील झिंगाट, याड लागलं, सैराट झाला जी, आताच बया का बावरला आणि व्हेंटिलेटर या चित्रपटातील बाबा या गाण्यांना रसिकांनी भरभरून पसंती दिली.

These songs from Marathi films of the year 2016 will be celebrated by the audience. | 2016 या वर्षातील मराठी चित्रपटातील या गाण्यांनी रसिकांना सैराटमय केले.

2016 या वर्षातील मराठी चित्रपटातील या गाण्यांनी रसिकांना सैराटमय केले.

2016
चे वर्ष हे सैराटचे वर्षं आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण रसिक सैराट या चित्रपटातील सगळ्याच गाण्यांच्या प्रेमात पडले. आज कोणत्याही समारंभात हीच गाणी लावली जातात. या गाण्यावर लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच ताल धरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 

1. झिंगाट
सैराट या चित्रपटातील झिंगाट हे गाणे ऐकल्यावर आपोआपच पाय थिरकू लागतात. झिंगाट या गाण्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच वेड लावले आहे. या गाण्यावर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीही ताल धरला आहे. त्यामुळे या वर्षातील सर्वात लोकप्रिय गाणे म्हणून झिंगाटचीच निवड योग्य आहे.



2. याड लागलं
सैराट याच चित्रपटातील याड लागलं या गाण्याने लोकांना अक्षरशः याडच लावले आहे. अजय गोगावलेने गायलेले हे गाणे आज रसिकांच्या ओळांवर रुळले आहे. या गाण्याने रसिकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे.


 

3. सैराट झाला जी
सैराट या चित्रपटाचे सैराट झाला जी हे शीर्षकगीत सैराट या चित्रपटाच्या कथेला योग्य न्याय देतं. अजय-अतुलच्या संगीताने या गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवलंय.  



4. आताच बया का बावरला
आताच बया का बावरला हे गाणे प्रेमात पडलेल्या प्रत्येकाला आपलेसे वाटते. श्रेया घोषालच्या मखमली आवाजाने या गाण्याला चार चाँद लावलेत.



5. बाबा
व्हेंटिलेटर या चित्रपटातील बाबा हे गाणे बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्राने गायले आहे. तिने या गाण्यातून व्यक्त केलेल्या भावना रसिकांच्या मनाला स्पर्शून गेल्या.

Web Title: These songs from Marathi films of the year 2016 will be celebrated by the audience.