"...तर तशा प्रकारचे कॉम्प्रोमाइज आयुष्यभर करावेच लागतात", इंडस्ट्रीबद्दल सई ताम्हणकर स्पष्टच बोलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 13:00 IST2024-01-31T13:00:00+5:302024-01-31T13:00:00+5:30
Sai tamhankar: सईने सांगितला कॉम्प्रोमाइज करण्याचा नेमका अर्थ काय

"...तर तशा प्रकारचे कॉम्प्रोमाइज आयुष्यभर करावेच लागतात", इंडस्ट्रीबद्दल सई ताम्हणकर स्पष्टच बोलली
मराठी कलाविश्वातील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून कायम सई ताम्हणकरकडे (sai tamhankar) पाहिलं जातं. मराठीसह बॉलिवूडमध्येही सईने तिची छाप पाडली आहे. त्यामुळे आज सई कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 'मीमी', 'दुनियादारी', 'हंट', 'तु ही रे', 'नो एन्ट्री' अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये झळकलेली सई लवकरच 'श्रीदेवी प्रसन्न' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने तिने नुकतीच 'लोकमत फिल्मी'च्या 'नो फिल्टर' शोमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये तिने इंडस्ट्रीत कराव्या लागणाऱ्या तडजोडींवर भाष्य केलं आहे.
इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर कॉम्प्रोमाइज करावं लागतं का? असा प्रश्न सईला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देतांना तिला आलेले अनुभव सांगितले. तसंच तिचं मतही मांडलं.
नेमकं काय म्हणाली सई?
"मला नाही वाटत की कॉम्प्रोमाइज करावं लागतं. तुम्ही तुमच्या टर्म्सवर काम करु शकता. आणि, त्याचं सगळ्यातं मोठं उदाहरण इथे तुमच्यासमोर (मी) बसलं आहे. मी माझ्याच टर्मवर काम केलंय. मग ते कपडे असोत, मेकअप असो किंवा मग सवयी असो किंवा मी चार्ज करणारं मानधन असो. मला वाटतं ज्याच्यासाठी तुम्ही पात्र आहात ते सगळं तुम्हाला मिळालं पाहिजे", असं सई म्हणाली.
पुढे ती म्हणते, "जर रिलेशनशीपमध्ये आपण म्हणतो ना की नाही यार कॉम्प्रोमाइज करायलाच लागतं तर तशा प्रकारचे कॉम्प्रोमाइज आयुष्यभर करावेच लागतात. उदाहरणार्थ, जर तुम्हाला नाईट शिफ्ट नाही जमत तरी पण नाईट शूट करावंच लागतं. कारण, ती तुमच्या स्क्रिप्टची डिमांड आहे. त्यामुळे तुम्हाला ते करावंच लागतं. तर असे कॉम्प्रोमाइज हजार आहेत."
दरम्यान, या मुलाखतीमध्ये तिने तिच्या फिल्मी करिअरवर सुद्धा भाष्य केलं. तिला कसं सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला हे सुद्धा तिने सांगितलं. त्यामुळे सध्या ती चर्चेत येत आहे. सईचा 'श्रीदेवी प्रसन्न' हा सिनेमा येत्या २ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात तिच्यासोबत सिद्धार्थ चांदेकरने स्क्रीन शेअर केली आहे.