मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 12:23 IST2025-05-19T12:22:43+5:302025-05-19T12:23:41+5:30
पैसा, प्रसिद्धी महत्नाचं नाही तर 'सर्वात आधी देश' अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
भारत-पाकिस्तान तणावानंतर तुर्की, अझरबैजान आणि मलेशिया सारख्या देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला. यामुळे भारतीय नागरिकांनी आता या देशांवर बहिष्कार टाकला आहे. या देशांमध्ये फिरायला जाणं रद्द केलं आहे. ज्यांनी तिकीटे बुक केली होती त्यातली ५० टक्के बुकिंग रद्द करण्यात आली. नुकतंच एका मराठी गायकाने त्याची तुर्की मध्ये होणारी कॉन्सर्ट रद्द केली आहे. 'सर्वात आधी देश' अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
मराठी तसंच हिंदी म्युझिक इंडस्ट्रीत लोकप्रिय असलेला गायक राहुल वैद्यने (Rahul Vaidya) तुर्कीच्या कॉन्सर्टची ऑफर नाकारली आहे. तो म्हणाला, "ही ऑफर खूपच चांगली होती. ते मला कॉन्सर्टसाठी ५० लाख देणार होते. पण मी म्हटलं की कोणतंही काम, पैसा, आणि प्रसिद्धी देशासमोर मोठं नाही. त्यांनी मला याहीपेक्षा जास्त पैसे ऑफर केले पण मी स्पष्ट नकार देत हे पैशांसंदर्भात नाही असं सांगितलं. हा मुद्दा याहीपेक्षा मोठा आहे. हे वैयक्तिक नाही तर देशाच्या हितासाठी आहे. आपण आपल्या देशासोबत उभं राहिलंच पाहिजे."
तो पुढे म्हणाला, " जो माझ्या देशाचा वैरी आहे आणि भारताचा सम्मान करत नाही अशा देशात जाण्यात मला काहीही रस नाही. मी आज जो काही आहे तो या भारत देशामुळे आणि देशवासियांमुळेच आहे. जो कोणी माझ्या देशाविरोधात आणि देशहिताविरोधात जाईल त्याला माफ करणार नाही. भारतीय लोक तुर्कीत जाऊन खूप खर्च करतात. तिथे लग्न करतात. असं करुन आपण त्यांनाच श्रीमंत बनवत आहोत. आपण त्यांना करोडोंची कमाी करुन देतो आणि ते अशा पद्धतीने याची परतफेड करतात? अशा देशात आपण का खर्च करायचा जे प्रामाणिकच नाहीत. जो कोणी देशाविरोधात आहे तो आपल्याविरोधात आहे हे इतकं सरळ आहे."