सिनेमागृहाबाहेर वडिलांनी पेपरवर झोपून काढले दिवस; त्यासमोरच्या टॉवरमध्ये घेतलं सिद्धार्थने घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 13:50 IST2023-05-14T13:48:59+5:302023-05-14T13:50:44+5:30
Siddharth jadhav: लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला हा अभिनेता आजही त्याच्यातील मध्यमवर्गीयपणा जपतो.

सिनेमागृहाबाहेर वडिलांनी पेपरवर झोपून काढले दिवस; त्यासमोरच्या टॉवरमध्ये घेतलं सिद्धार्थने घर
उत्तम अभिनयशैली, हटके स्टाइल स्टेटमेंट आणि दिलदारपणा यामुळे कायम चर्चेत येणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव (siddharth jadhav). आज सिद्धार्थने मराठीसह बॉलिवूडमध्येही त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आज सगळीकडे त्याची चर्चा होते. विशेष म्हणजे लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला हा अभिनेता आजही त्याच्यातील मध्यमवर्गीयपणा जपतो.अलिकडेच त्याने मुंबईत त्याच्या आई-वडिलांसाठी घर खरेदी केलं. याविषयी त्याने त्याचं मत मांडलं आहे.
अनेक सिनेमांमध्ये झळकलेला सिद्धार्थ सध्या 'आता होऊ दे धिंगाणा' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमात अलिकडेच त्याच्या आई-वडिलांनी हजेरी लावली होती. यावेळी त्याने त्याच्या आईवडिलांनी किती कष्ट केले यावर भाष्य केलं.
'माझे बाबा दादरच्या प्लाझा चित्रपटगृहाबाहेर पेपर टाकून त्यावर झोपायचे', असं सांगितलं होतं. त्यानंतर त्याने एक मुलाखतीत दिली. या मुलाखतीत आई-वडिलांनी किती कष्टात दिवस काढले हे सांगितलं.
सिद्धार्थ एकदा नदीत बुडत असताना त्याच्या आईने त्याला वाचवलं शिवाय दोन वेळा तो हरवला होता त्याप्रसंगीदेखील आईने त्या शोधून काढलं. विशेष म्हणजे आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव म्हणून त्याने त्यांच्यासाठी गोरेगावमध्ये त्यांच्या हक्काचं घर घेतलं. इतकंच नाही तर ज्या प्लाझा सिनेमागृहाबाहेर त्याचे वडील पेपरवर झोपायचे त्याच सिनेमागगृहाच्या समोर असलेल्या टॉवरमध्ये त्याने आणखी एक घर घेतलं आहे. या घरात तो संपूर्ण कुटुंबासोबत राहतो.