शुबमन गिलची शतकी खेळी, मराठी अभिनेत्याची पोस्ट; म्हणाला, "पोहोचवलं बाबा याने..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 13:35 IST2023-05-22T13:34:35+5:302023-05-22T13:35:58+5:30
काल गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यात पार पडलेला सामना रोमहर्षक होता.

शुबमन गिलची शतकी खेळी, मराठी अभिनेत्याची पोस्ट; म्हणाला, "पोहोचवलं बाबा याने..."
सध्या आयपीलएल (IPL)चा हंगाम सुरु आहे. काल गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यात पार पडलेला सामना थरारक होता. आरसीबीने ठेवलेल्या १९८ धावांचं लक्ष गुजरात टायटन्सने यशस्वी पेलत विजय मिळवला. यामध्ये हायलाईट होता तो शुबमन गिल (Shubman Gill). त्याच्या उत्कृष्ट शतकी खेळीने गुजरात टायटन्सने बाजी मारली तर सोबतच याचा फायदा मुंबई इंडियन्सलाही झाला. मुंबई इंडियन्सचं प्लेऑफ मधील स्थान निश्चित झालं. या रोमहर्षक मॅचवर मराठी अभिनेताप्रथमेश परबनेही (Prathamesh Parab) पोस्ट केली आहे.
शुबमन गिलने आरसीबी विरुद्धच्या सामन्यात ५२ चेंडूत ८ षटकार आणि ५ चौकारांच्या जोरावर १०४ धावांची नाबाद शतकी खेळी केली. या आधीही शुबमन काही सामन्यात जबदरस्त कामगिरी केली आहे. विराट कोहलीने त्याचं कौतुक केलं होतं. तर आता कालच्या सामन्यानंतर शुबमनने सोशल मीडियावर त्याच्या फोटोंची एक पोस्ट शेअर केली. 'आता सुरुवात झाली आहे' असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. तर त्याच्या याच फोटोवर प्रथमेश परबने “भविष्य” अशी कमेंट केली आहे.
इतकंच नाही तर मुंबई इंडियन्सला याचा फायदा झाल्याने प्रथमेश खूश आहे. शुबमनचे धन्यवाद मानत त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले,'पोहोचवलं बाबा याने आपल्याला.' शुबमन गिल भविष्य आहे ही कबुली विराट कोहलीने याधीच दिली होती. कालच्या शुभमनच्या अप्रतिम खेळीनंतर ते पुन्हा एकदा सिद्ध झालं.