संजय नार्वेकरांनी उडवली Sanjay Jadhav ची खिल्ली; चार लोकांमध्ये म्हणाले 'कचऱ्याचा डब्बा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 17:19 IST2023-04-04T17:18:24+5:302023-04-04T17:19:15+5:30
Sanjay jadhav: संजय जाधव यांना कचरा म्हणत संजय नार्वेकरांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

संजय नार्वेकरांनी उडवली Sanjay Jadhav ची खिल्ली; चार लोकांमध्ये म्हणाले 'कचऱ्याचा डब्बा'
मराठी कलाविश्वातील दोन दिग्गज सेलिब्रिटी म्हणजे संजय जाधव आणि दुसरा संजय नार्वेकर. या दोन्ही कलाकारांनी कलाविश्वात त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. संजय जाधव त्याच्या दर्जेदार सिनेमांसाठी ओळखले जातात. तर, संजय नार्वेकर त्यांच्या अभिनयामुळे. परंतु, सध्या या दोन्ही दिग्गजांमध्ये वादाची ठिणगी पडली असून संजय नार्वेकरांनी चक्क संजय जाधवला कचऱ्याची उपमा दिली आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सध्या सोशल मीडिया या दोघांचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते एकमेकांची मस्करी करताना दिसत आहेत. सध्या हे दोन्ही कलाकार लंडनमध्ये असून त्यांच्या आगामी सिनेमाचं शूटिंग करत आहेत. त्यामुळे या सिनेमाच्या सेटवरील अनेक फोटो, व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामधल्या अशाच एका व्हिडीओमध्ये संजय नार्वेकर, संजय जाधवला कचरा म्हटलं आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अभिनय बेर्डे, प्रार्थना बेहरे, शिवानी सुर्वे ही सगळी कलाकार मंडळी कुशल बद्रिकेला मिस करत आहेत. त्यांच्या मनातली कुशलची कमतरता ते संजय जाधवला सांगत आहे. याच वेळी तिथे संजय नार्वेकर येतात, आणि काय चाललंय असं विचारतात. त्यावर संजयजी, इंडस्ट्रीत कोणाला काही दुःख व्यक्त करायचं असेल तर सगळे माझ्याकडेच येतात..जसे हे आलेयत आता...'',असं संजय जाधव सांगतो.
संजय जाधवचं हे वाक्य ऐकल्यावर संजय नार्वेकर म्हणतात,''मनात जे दुःख,चिंता साठलीय ती सगळी कचऱ्यासारखी असते आणि कचरा आपण कुठे टाकतो..तेव्हा संजय जाधव म्हणतात..कचऱ्याचा डब्बा...आणि हे बोलल्यावर त्यांना शॉक लागतो''.
दरम्यान, सध्या ही कलाकारांची फौज लंडनमध्ये त्यांच्या आगामी सिनेमाचं चित्रीकरण करत आहे. त्यामुळे तेथील अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत ते चर्चेत येत आहेत.