प्रसाद खांडेकरच्या 'एकदा येऊन तर बघा' सिनेमासाठी सई ताम्हणकरची पोस्ट, म्हणाली, "भावा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 16:34 IST2023-12-08T16:34:25+5:302023-12-08T16:34:46+5:30
प्रसादच्या पहिल्या चित्रपटासाठी मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने खास पोस्ट शेअर केली आहे.

प्रसाद खांडेकरच्या 'एकदा येऊन तर बघा' सिनेमासाठी सई ताम्हणकरची पोस्ट, म्हणाली, "भावा..."
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सिनेमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे प्रसाद खांडेकर. अभिनेता असण्याबरोबरच प्रसाद उत्तम लेखक आणि दिग्दर्शकही आहे. 'एकदा येऊन तर बघा' हा सिनेमा घेऊन प्रसाद प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दिग्दर्शक म्हणून त्याचा हा पहिलाच सिनेमा आहे. या चित्रपटातून विनोदाची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. अनेक तगडे कलाकार प्रसादच्या या सिनेमात झळकले आहेत. प्रसादच्या या पहिल्या चित्रपटासाठी मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने खास पोस्ट शेअर केली आहे.
सईने तिच्या इन्स्टाग्रामवरुन 'एकदा येऊन तर बघा' सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. या सिनेमासाठी सईने प्रसादला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. "भावा, ऑल द बेस्ट...चित्रपटाच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप सारं प्रेम", असं सईने पोस्टमध्ये म्हटलं आहे. प्रसाद खांडेकरच्या सिनेमासाठी सईने केलेली ही पोस्ट चर्चेत आली आहे.
प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'एकदा येऊन तर बघा' हा मराठी सिनेमा शुक्रवारी(८ डिसेंबर) सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमात महाराष्ट्राची हास्यजत्रामधील कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, ओंकार भोजने हे कलाकार झळकले आहेत. याबरोबरच भाऊ कदम, तेजस्विनी पंडीत, सयाजी शिंदे या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.