महाराष्ट्राची वहिनी आहे जिनिलिया; पण डिसूझांचा जावई म्हणून रितेश नेमका कसा आहे? रितेशने सांगितला भन्नाट किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 15:18 IST2022-12-28T15:11:24+5:302022-12-28T15:18:59+5:30

जिनिलियाला तर चाहते महाराष्ट्राची वहिनी म्हणूनच बघतात. पण आपला मराठमोळा रितेश देशमुख डिसुझा फॅमिलीचा जावई म्हणून नेमका कसा आहे

reteish-deshmukh-talks-about-his-relation-with-dsouza-family-and-shared-a-memory | महाराष्ट्राची वहिनी आहे जिनिलिया; पण डिसूझांचा जावई म्हणून रितेश नेमका कसा आहे? रितेशने सांगितला भन्नाट किस्सा

महाराष्ट्राची वहिनी आहे जिनिलिया; पण डिसूझांचा जावई म्हणून रितेश नेमका कसा आहे? रितेशने सांगितला भन्नाट किस्सा

Ved Marathi Movie : रितेश आणि जिनिलिया हे क्युट कपल सगळ्यांचेच आवडीचे आहेत. दोघांच्या लग्नाला २० वर्ष झाली आहेत. जिनिलियाला तर चाहते महाराष्ट्राची वहिनी म्हणूनच बघतात. पण आपला मराठमोळा रितेश देशमुख डिसुझा फॅमिलीचा जावई म्हणून नेमका कसा आहे हे जाणून घ्यायला चाहते नक्कीच उत्सुक असणार. यावर रितेशने लोकमतशी बोलताना भन्नाट किस्सा सांगत उत्तर दिले आहे 

रितेश सांगतो, डिसुझा फॅमिलीला मी पहिल्या सिनेमापासून ओळखतो म्हणजेच  २००१ पासून आमची ओळख आहे. त्यावेळी मी त्यांना अंकल-आंटी म्हणायचो आता मम आणि पॉप्स असं म्हणतो. एवढ्या वर्षात ते मला सातत्याने ते प्रेमच देत आले आहेत आणि खूप गोड असं ते कुटुंब आहे. जिनिलियाचे आई बाबा आणि तिचे भाऊ सर्वांनीच मला आजवर प्रेम दिले आहे.

रितेशने डिसुजा फॅमिली बद्दल एक भन्नाट किस्साही सांगितला. रितेश पुढे म्हणाला,  मी आणि माझा मित्र एकदा त्यांच्या घरी गेलो एका सदस्याचा वाढदिवस होता. वाढदिवसाला केक कट करत असताना  हॅपी बर्थडे टु यु असं आपलं नेहमीचं गाणं सुरु झालं. आम्हीही टाळ्या वाजवून गाणं म्हणत होतो. गाणं संपलं म्हणलं चला आता केक खाऊया तर तेवढ्यात पुन्हा हॅपी हॅपी बर्थडे बर्थडे असं दुसरं गाणं सुरु झालं. दुसरं संपलं तिसरं सुरु झालं, मी आणि माझा मित्र एकमेकांकडे बघतच राहिलो. तेव्हा आम्हाला कळलं की वाढदिवसाला यायचं असेल तर हा सुरुवातीला १५ मिनिटांचा कार्यक्रम निश्चित आहे. 

महाराष्ट्राने आणि देशमुख कुटुंबाने जिनिलियावर जितकं प्रेम केलंय तितकंच प्रेम रितेशला साऊथमधून आणि डिसूजा फॅमिली मधून मिळत आहे. रितेशचे जिनिलियाच्या भावांसोबतही मैत्रीपूर्ण संबंध आहेत असं रितेश सांगतो. रितेश आणि जिनिलिया दोघांमधलं क्युट बॉंडिंग नेहमीच दिसलं आहे म्हणूनच दोघेही महाराष्ट्राचे लाडके आहेत.

रितेश आणि जिनिलियाचा वेड हा मराठी सिनेमा ३० डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. सिनामातील नुकत्याच रिलीज झालेल्या सलमान खान आणि रितेशवर चित्रीत मला वेड लावलंय या गाण्याने सध्या सर्वांनाच वेड लावले आहे.

Web Title: reteish-deshmukh-talks-about-his-relation-with-dsouza-family-and-shared-a-memory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.